चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा

चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चाळीसगाव नगरपरिषदेतर्फे आज नगरपरिषद मुख्य कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण व वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिक, शाळांचे मुख्याध्यापक, वृक्षप्रेमी व बचतगटातील महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, उपमुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरण अधिकारी आशिष लोकरे, सहायक वृक्ष प्राधिकरण अधिकारी सचिन निकुंभ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात वृक्षसंवर्धनाचे महत्व अधोरेखित करत मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी चाळीसगाव नगरपरिषदेच्या वृक्षारोपण मोहिमेची माहिती दिली आणि वृक्ष संगोपनाचा संदेश दिला. कार्यक्रमात उपस्थितांना विविध प्रकारचे वृक्ष वाटप करण्यात आले. यामध्ये बचतगटांच्या महिलांबरोबरच चाळीसगाव नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील शाळांचे मुख्याध्यापक, वृक्षप्रेमी नागरिक यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे नगरपरिषद आवारात प्रत्यक्ष वृक्षारोपण देखील करण्यात आले. कार्यक्रमास नगरपरिषदेचे कर निरीक्षक गोपाळ शिंदे, आरोग्य निरीक्षक अनिल गाढे, संजय गोयर, विजय जाधव तसेच नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें