कृषि महाविद्यालय, फलटण येथे ग्रामिण कृषि कार्यानुभव कार्यक्रम संदर्भात पालक सभेचे उत्साहात आयोजन

कृषि महाविद्यालय, फलटण येथे ग्रामिण कृषि कार्यानुभव कार्यक्रम संदर्भात पालक सभेचे उत्साहात आयोजन

 

फलटण एज्यूकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामिण कृषि कार्यानुभव 2025-26 संदर्भात पालक सभा उत्साहात पार पडली. पालक सभेचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. ढाल्पे यांनी करताना पालक सभेचे उद्देश, ग्रामिण कृषि कार्यानुभाचे महत्व, या कार्यक्रमातील महत्वाचे उपक्रम ग्रामिण भाग सहभाग, कृषि सबंधित शैक्षणिक, संशोधन, विस्तार अभ्यास, पिक चिकित्सालय अभ्यास, कृषि संबंधित औद्योगिक अभ्यास याबद्दल सविस्तर माहिती दिली. सदरील कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. एस. एम. साळुंखे व विध्यार्थ्यांनीसाठी प्रा. एन. ए. पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे यांनी ग्रामिण कृषि कार्यानुभाचे सविस्तर महत्व व विध्यार्थीनि पाळवायचे नियम व शिस्त याबद्दल माहिती दिली. सभेला उपस्थित विध्यार्थी पालक सौ. दीपाली लडकत व श्री. भागवत चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामकाज सबंधित कौतुकास्पद मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण करताना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी ग्रामिण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे अनुभव, कार्यक्रम राबविताना विध्यार्थांची जबाबदारी व शिस्त, महाविद्यालयाची व पालकांची जबाबदारी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पालक सभेसाठी कृषि महाविद्यालयातील संबंधित विषय तज्ञानी विषयांचे मार्गदर्शन केले यामध्ये विशेषतः प्रा. एस. एस. आडत, प्रा. स्वप्नील लाळगे, प्रा. जी. एस. शिंदे उपस्थित होते. या सभेला विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि महाविद्यालयातील संबंधित प्राध्याकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.पालकांनी प्राद्यापकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि शंका दूर केल्या. तसेच यानंतर महाविद्यालयातील विविध शैक्षणिक आणि सह-शैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. पालकांनी या सभेचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे व महाविद्यालयाचे आभार मानले. तसेच विध्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्राध्यापकांनी केलेले मार्गदर्शन आणि सहकार्य याबद्दल समाधान व्यक्त केले. पालक सभेचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. पंडित यांनी केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें