माणसाचं चरित्र हेच खरं वैभव – प्रा.डॉ. प्रशांत महाराज ठाकरे

माणसाचं चरित्र हेच खरं वैभव
– प्रा.डॉ. प्रशांत महाराज ठाकरे

कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना – “माणसाचं चरित्र हेच त्याचं खरं वैभव असून, हेच सर्वात मोठं संपत्ती असते” असे प्रेरणादायी प्रतिपादन ह. भ. प. प्रा. डॉ .प्रशांत महाराज ठाकरे यांनी केले. ते कोरपना येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय कीर्तनात बोलत होते. भारतीय जनता पार्टी शहर कोरपना च्या वतीने शनिवार, दिनांक ३१ मे रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरपना येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कीर्तनात ह. भ. प. प्रा.डॉ .प्रशांत महाराज ठाकरे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करतानाच, समाजाला योग्य दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची महती विशद केली. त्यांनी आपल्या प्रभावी आणि हृदयस्पर्शी कीर्तनातून उपस्थित श्रोत्यांना जीवनमूल्यांची जाणीव करून दिली. त्यांनी सांगितले की, “चरित्रहीन शिक्षण, पैसा, आणि प्रतिष्ठा निरर्थक ठरते. त्यामुळे प्रत्येकाने चारित्र्यवान होण्याचा प्रयत्न करावा.”
या कार्यक्रमाला ह. भ. प. विठ्ठल महाराज डाखरे, ह. भ. प. मिनाथ महाराज पेटकर यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुसळे, भास्करराव मुसळे, उत्तम मोहितकर, आबिद अली, किशोर बावणे, शशिकांत आडकिने, आशिष ताजने, पुंडलिक उलमाले, नगरसेविका गीता डोहे, नगरसेविका सविता तुमराम, नगरसेविका आशाताई झाडे,महिला तालुकाध्यक्ष जोशना वैरागडे ,सत्यवान घोटेकर. प्रा. संजय ठावरी , पुंडलिक उलमले. इंदिरा कोल्हे, शोभा आगलावे, शांताराम देरकर, सुनील बावणे, सुभाष तुरनकार यांची प्रमुख मान्यवरांचे उपस्थिती होती.या कार्यक्रमाला कोरपना शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती..

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें