चंद्रकांतदादा जाधव यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी हॅटट्रिक

चंद्रकांतदादा जाधव यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी हॅटट्रिक

सातारा, दि. १ (प्रतिनिधी) – शिवसेनेच्या लढाऊ शैलीने सातारा जिल्ह्यात आपला दबदबा निर्माण करणारे नेते चंद्रकांतदादा जाधव यांनी सलग तिसऱ्या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत हॅटट्रिक साधली आहे. जिल्ह्यातील एकमेव पदाधिकारी म्हणून त्यांनी हा मान मिळवला आहे.

सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना चंद्रकांतदादांनी स्वकर्तृत्वावर जिल्ह्याच्या राजकारणात आपली छाप पाडली. २००४ पासून तब्बल वीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी शिवसेनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि २०१६ पासून सलग जिल्हाप्रमुख अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही त्यांनी रस्त्यावरील आंदोलनांतून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि शिवसेनेचा आवाज बुलंद ठेवला. नव्या-जुन्या शिवसैनिकांशी समन्वय साधत त्यांनी पक्षसंघटना मजबूत ठेवली.

२०२२ मध्ये शिवसेनेतील बंडानंतर चंद्रकांतदादांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. तिथेही त्यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आता पुन्हा एकदा त्यांची या पदावर फेरनिवड झाली असून, त्यांनी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. यापूर्वी हिंदुराव नाईक-निंबाळकर, नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव आणि दीपक पवार यांना हे पद दोनदा भूषवण्याची संधी मिळाली होती. मात्र, सलग तीन वेळा ही जबाबदारी सांभाळणारे चंद्रकांतदादा जाधव हे जिल्ह्यातील एकमेव नेते ठरले आहेत.

फोटो कॅप्शन: शिवसेना जिल्हाप्रमुखपदी सलग तिसऱ्यांदा निवड होऊन हॅटट्रिक साधणारे लढाऊ नेते चंद्रकांतदादा जाधव.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें