गवळीवाडा व लक्ष्मीनगर परीसरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे नगरपालिकेला निवेदन

गवळीवाडा व लक्ष्मीनगर परीसरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे नगरपालिकेला निवेदन

चाळीसगांव प्रतिनिधी:- 

शहरातील बस स्टॅन्ड जवळील गवळीवाडा व लक्ष्मीनगर परीसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून घाणीमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, येथील काही नागरिक नेहमीच त्यांचे जनावरे व म्हशी रस्त्यावर बांधुन शेणाचे उकिरडे घाण व मलमुत्र नाल्यामध्ये फेकतात व घाण करतात परिणामी येथील गटारी व नाले घाणीने तुटुंब भरल्याने किडे होऊन येथील नागरिकांच्या घरात दुर्गंधी पसरत असते, यामुळे साथीचे आजार पसरून 

नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाले आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ स्वच्छाता मोहिम राबवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे,

या संदर्भात नुकतेच परिसरातील नागरिकांनी चाळीसगाव नगर पालिकेला निवेदन दिले असून, नगर पालिकेने याबाबी कडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर सागर राखुंडे, दीपक देवरे, गोलू सपके, ओम गवळी, विनोद गवळी, अशा वाणी, मुकेश वाघरी, संदीप वाघरी, सुमित वाघरी, मिनाबाई कायस्थ, युवराज राखुंडे, काळू वाघरी, संजय वाघरी, आकाश कसबे, किरण माने, मिलिंद राखुंडे यांच्यासह या परिसरातील नागरिकांच्या सह्या आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal