एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल

एन.डी.आर.एफ.ची पथक कराड येथे दाखल

सातारा, दि.२8: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांचे मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यात मान्सून कालावधीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एन. डी. आर. एफ. ची एक पथक तैनात करण्यात आली असून हे पथक कराड येथे दाखल झाले आहे.

   एन.डी.आर.एफ. पथकाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कराडचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी स्वागत केले. या पथकामध्ये एकूण 25 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये दोन अधिकारी व जवान यांचा समावेश आहे. जलद आणि तात्काळ मदत पोहोचविणे तसेच शोध व बचाव कार्य जलद गतीने होण्यासाठी या पथकाचा सातारा जिल्ह्याला उपयोग होणार आहे. एन. डी. आर. एफ. च्या पथकाकडे एकूण तीन बोटी त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत उपयोगी होणारे सर्व शोध व बचाव कार्य इत्यादी साहित्यांचा समावेश आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal