गायकवाड परिवाराकडून नवसाला पावणारी देवी सटीआई माता मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):-
तालुक्यातील तरवाडे बु. येथील गेल्या ५० वर्ष जुने सटीआई मातेच्या मंदिराचे महाराष्ट्रातील विविध भागात राहत असलेल्या गायकवाड परिवारातील सदस्यांच्या भरघोस देणगीतून साकारले जात असलेल्या देवीची मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु असून दि.८.५.२०२५ रोजी संध्या ५.३० वा धान्यनिवास पूजन असुन दि.९.५.२०२५ रोजी पुरोहित श्री.अवधूत गर्गे यांच्या मार्गदर्शनाने सटीआई मातेच्या नूतन मंदिरात मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा सकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत संपन्न होणार आहे त्यानंतर १२ वा देवीची महाआरती होईल, १२.३० ते ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
सदर पूजेसाठी गायकवाड परिवारातील इच्छुक ११ जोडपे बसणार असून सकाळी ८ वाजता गावातून मूर्तीची भव्य मिरवणुक देखिल निघणार आहे. मिरवणुकीत राज्यातील विविध ठिकाणाहून सर्व गायकवाड बंधूंची, गावातील नागरिक यांची उपस्थिती विशेष असणार आहे त्यासाठी परिवारातील सर्वांनी मिळुन कार्यक्रम शिस्तबद्ध व नियोजन व्यवस्थित व्हावे यासाठी दि.४.५.२०२५ रोजी सर्वांनी मिळुन कार्यक्रम नियोजन समिती स्थापन करण्यात आली. त्यात गायकवाड परिवारातील व गावातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. सटीआई मातेच्या भक्तांना कार्यक्रमास येण्याचे आव्हान मंदिर विकास समितीच्या सदस्यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील तसेच ग्रा. सदस्य, वि.का.सो.सदस्य यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे.













