सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे चे राज्य सरकारच्या ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमामध्ये घवघवीत यश – 

सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे चे राज्य सरकारच्या ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमामध्ये घवघवीत यश – 

राज्य सरकारकडून नुकत्याच राबवण्यात आलेल्या ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात फलटण तालुक्यातून सरस्वती शिक्षण संस्थेचे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने अव्वल स्थान पटकावले. या उपक्रमात प्रोग्रेसिव्हने तृतीय क्रमांक पटकविला. या अंतर्गत शाळेला राज्य सरकारकडून यथोचित मानसन्मान व बक्षीस देण्यात आले. गुणवरे सारख्या ग्रामीण भागात कार्यरत असून सुद्धा प्रोग्रेसिव्ह ही शाळा दर दरवर्षी नवनवीन उपक्रमांमध्ये स्पर्धांमध्ये भाग घेऊन उज्वल यश मिळवत असते. जसे की तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, केंद्र व तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा, तसेच इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले घवघवीत यश होय. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून राबविले जाते. राज्यभरातील शाळांचा दर्जा सुधारावा म्हणून या उपक्रमांतर्गत शाळांना बक्षीसे देण्यात येतात. प्रशस्त इमारत, अद्ययावत ग्रंथालय, प्रशस्त क्रीडांगण, स्वच्छ व प्रशस्त स्वच्छतागृहे, हवेशीर व प्रशस्त वर्ग खोल्या, विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग ची सोय, अबॅकस, मंथन, शिष्यवृत्ती, डायमंड टॅलेंट सर्च, ई. सारख्या स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाणारी तयारी, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग, शाळेचे सुव्यवस्थित नियोजन तसेच शाळेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सोयी सुविधा या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने शाळेला तृतीय क्रमांक जाहीर केला.

शाळेचे सचिव आदरणीय श्री. विशाल पवार सर शाळेच्या संचालिका, सौ. प्रियांका पवार मॅडम यांनी शाळेतील सर्व स्टाफ चे अभिनंदन करून शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. किरण भोसले सर व समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ मॅडम यांनीही शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. शाळेचे सचिव आ. श्री. विशाल पवार सर यांनी बोलताना असे सांगितले की, प्रोग्रेसिव्ह स्कूल नेहमीच नवनवीन उपक्रमांसाठी तयार असते. भविष्यातही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह नेहमी तत्पर असेल. तसेच शाळेतील शिक्षक वृंदाला याचे श्रेय जाते, ते पुढे असे म्हणाले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी भविष्यातही आपली शाळा नेहमी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तयार असेल आणि याचे सर्व श्रेय आ. श्री. विशाल पवार सर यांच्या अचूक मार्गदर्शनाला जाते असे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. किरण भोसले सर यांनीही सर्व शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले.

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें