चाळीसगाव आगारात बीएस-सिक्स प्रणालीच्या नवीन पाच बस दाखल आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

चाळीसगाव आगारात बीएस-सिक्स प्रणालीच्या नवीन पाच बस दाखल आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

चाळीसगाव बस आगाराला बीएस-6 प्रणालीच्या नवीन पाच बसेस मिळाल्या. चाळीसगाव एसटी आगार हे तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असून या स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी नवीन बसेस मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. गेल्या महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही त्यांनी ही मागणी लावून धरली होती, बसेस जुन्या असल्याने अनेक वेळा नादुरूस्त होण्याचे प्रकार घडतात. मात्र आगराला आता नवीन बसेस मिळाल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. आगाराच्या या नवीन बसेसचा लोकार्पण शुभारंभ रामनवमीच्या मुहुर्तावर रविवार दि.६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० आमदा रमंगेश चव्हाण व विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते हस्ते पार पडला. चाळीसगाव बस आगारासाठी एकूण १० नवीन बसेस मंजूर केल्या आहेत. त्यापैकी ५ बसेसचे आज लोकार्पण करण्यात आले असून उर्वरित बसेस लवकरच आगारात दाखल होणार आहेत. यासोबतच चाळीसगाव येथे नवीन एसटी आगार बांधकामासाठी निधी मंजूर झाला असून प्रत्येक चाळीसगाव वासीयांना अभिमान वाटेल असे सुसज्ज बसस्थानक उभारण्याचे काम सुरू होईल असे आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर केले, यावेळी आगार प्रमुख मयुर पाटील, संजय पाटील, के.बी. साळुंखे, धनंजय मांडोळे, गुडू पगार, राजेंद्र राठोड, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, आनंद खरात प्रभाकर चौधरी, यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राज्य परिवहन महामंडळाचे महीला व पुरुष कर्मचारी उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें