देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकअप गाडीच्या अपघात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यु, तर पाच जण गंभीर जखमी
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
चाळीसगाव येथील कन्नड घाटाच्या पायथ्याशी पिकअप गाडीचा अपघात झाला या अपघात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहे, वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे, जखमींना तातडीने चाळीसगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातात मृत आणि जखमी व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. बुधवार दि.२ रोजी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप कठड्याला जाऊन धडकले. ही धडक इतकी भीषण होती की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच पाच प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले, तर वाहनातील इतर आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने चाळीसगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत आणि जखमी सर्व चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील एकाच कुटुंबातील असल्याचे समजते, देवदर्शनाहून संभाजीनगर मार्गे चाळीसगावकडे परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिस आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपघातमुळे कन्नड घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिस घटनास्थळी पोहचल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली.









