चाळीसगाव तालुकास्थरीय रिपाई आठवले पक्षाची बैठक संपन्न

चाळीसगाव तालुकास्थरीय रिपाई आठवले पक्षाची बैठक संपन्न

( चाळीसगांव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

रिपाई आठवले पक्षाची महत्व पूर्ण बैठक सिंधी मंगल कार्यालय येथे दि.३१ रोजी दुपारी पार पडली. प्रदेश उपाध्यक्ष रमेश मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैटकीच्या अध्यक्षस्थानी रिपाई आठवले जळगांव पच्छिमचे जिल्हा अध्यक्ष आनंद खरात होते. दि. ८ एप्रिल रोजी जळगांव येथे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थीत होणाऱ्या मेळावा यशस्वी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीत तालुका अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, युवा तालुका अध्यक्ष छोटू बागुल, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष खैरनार, युवक जिल्हा कार्याध्यक्ष धर्मजीत खरात, युवक तालुका कार्याध्यक्ष अविनाश पटावकर, शहर अध्यक्ष नितीन जवराळे, शहरकार्य अध्यक्ष किशोर मोरे यांच्यासह महत्वाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें