सह्याद्री साखर कारखान्यामध्ये बॉयलर चा स्फोट; पाच जण जखमी

सह्याद्री साखर कारखान्यामध्ये बॉयलर चा स्फोट; पाच जण जखमी

कराड; सह्याद्री सहकारी साखर कारखाना यशवंत नगर या ठिकाणी कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. कारखान्यातील बॉयलर चा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये तिघेजण जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जखमी झालेले तिघेही परप्रांतीय असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा स्फोट गॅसचा दाब वाढल्याने झाला असल्याचे म्हटले जात आहे. बॉयलरची तपासणी सुरू असताना हा स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटामुळे परिसर हादरून गेला होता. अपघातात जखमी झालेल्या पाच जणांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अपघातग्रस्तांची भेट विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी घेतली आहे. क्षमता नसलेल्या कंपनीला काम दिल्याने अपघात झाला आहे. असे मत विद्यमान आमदारांनी मांडले आहे. कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बॉयलरची तपासणी करण्यात आली. त्यामुळेच हा अपघात झाला. असा आरोप आमदार मनोज घोरपडे यांनी केला आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें