रहिमतपुर पोलीस ठाणेची कारवाई, रोमियोंना चाप, कॅफेचालकावर कारवाई
रहिमतपुर शहरात असणारे कॉलेज, हायस्कुलची संख्या जास्त असल्याने रहिमतपुर पंचक्रोशीतुन रहिमतपुर शहरात कॉलेज व हायस्कुलला येणारे विदयार्थी व विदयार्थिनींची संख्या जास्त आहे. त्यामुळे सध्या सर्वच ठिकाणी कॉलेज युवक व युवती यांची असणारी संख्या लक्षात घेता कॉफी, तसेच चार्यानज कॅफेची क्रेझ युवक/युवतीमध्ये आहे.
मा. पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख सो, मा. अपर पोलीसअधिक्षक सो श्रीमती वैशाली कडुकर,मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सो श्रीमती सोनाली कदम यांचे आदेशाप्रमाणे कॅफेमध्ये अश्लील चाळे करणारे युवक युवतींवर तसेच कॅफेचालकावर कारवाई करणेबाबत आदेशित करणेत आलेले होते. त्याप्रमाणे आज दिनांक १८ / ०३ / २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय बातमीनुसार ए. जेएस. कॅफे ॲण्ड चायनिज, वाठार रोड, रहिमतपुर येथे काही अल्पवयीन युवक युवती या कॅफेतील बनविलेल्या कपार्टमेंट मध्ये अश्लील चाळे करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सपोनि सचिन कांडगे यांनी पोउपनि जी. बी. केंद्रे व पोलीस पथकास ए. जेएस. कॅफे ॲण्ड चायनिज, वाठार रोड, रहिमतपुर येथे जावुन शहानिशा करुन कारवाई करणेबाबत आदेशित केलेनुसार पोउपनि जी. बी. केंद्रे व पोलीस पथकाने कॅफेमध्ये जावुन पाहणी केली असता रहिमतपुर पंचक्रोशीतील युवक व युवती अश्लील चाळे करताना दिसुन आले. त्यातील काही युवती या अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्याने सदरबाबत कॅफेचालक अमर रामचंद्र जाधव रा. साप, ता. कोरेगांव व संबंधित कॉलेज युवकांविरुध्द रहिमतपुर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे. श्रीमती
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो वैशाली कडुकर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सो श्रीमती सोनाली कदम यांचे मार्गदर्शनाखाली रहिमतपुर पोलीस ठाणेचे सपोनि सचिन कांडगे, पोउपनि जी. बी. केंद्रे, सफौ. जे. आर. पवार, पो.ना. एस. बी. शिंदे, , म.पो.कॉ.एम.टी. कांबळे, डी. जे. गिरी. एस. एस. पाटोळे यांनी केलेली आहे.
पो.कॉ.एम.एस.देशमुखपोलीस ठाणे हददीतील सर्व कॅफेचालकांनी त्यांचे
तसेच रहिमतपुर पोलीस ठाणेकडुन रहिमतपुर कॅफेमध्ये अल्पवयीन युवक व युवती यांना प्रवेश दिल्यास व कॅफेमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळुन आल्यास कारवाई करण्याचा इशारा देणेत आलेला आहे.
संबंधित कॅफेचालकाविरुध्द कडक तसेच संबंधित ए. जेएस. कॅफे ॲण्ड चायनिज, वाठार रोड, रहिमतपुर या कॅफेचा परवाना रदद करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.













