सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील शरिराविरुध्दचे गुन्हे करणा-या दोन टोळयांमधील १३ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार

 सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील शरिराविरुध्दचे गुन्हे करणा-या दोन टोळयांमधील १३ इसमांना सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार

फलटण प्रतिनिधी:सातारा जिल्यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) रोहीत भिमराव जाधव तसेच टोळी सदस्य २) राहुल भिमराव जाधव ३) गौरव बाळासो भंडलकर ४) ऋतिक दत्तात्रय जाधव ५) विशाल बाळासो भंडलकर सर्व रा. सरडे ता फलटण जि सातारा यांचे टोळीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करुन मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन गर्दी मारामारी करणे, दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे असे गंभीर स्वरुपाचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत.

तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) छगन मोहन मदने तसेच टोळी सदस्य २) चेतन शंकर लांडगे ३) साजन नानासो चव्हाण अ नं १ ते ३ रा सोनगांव बंगला ता फलटण जि सातारा ४) दिपक दत्तात्रय धायगुडे ५) आदेश सुखदेव जाधव ६) सुरज शिवाजी बोडरे ७) निलेश सुनिल जाधव ८) विक्रम ऊर्फ आप्पा लालासो जाधव अ नं ४ ते ८ रा. सरडे ता फलटण जि सातारा यांचे टोळीवर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन गर्दी मारामारी करणे, दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी करणे असे गंभीर स्वरुपाचे बरेचसे गुन्हे दाखल असल्याने वरील परस्पर विरोधी उपद्रवी टोळयांविरुध्द फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. सुनिल महाडीक यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा व पुणे जिल्हयातुन दोन वर्षे कालावधीकरीता पा करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केला होता. सदर प्रस्तावांची चौकशी श्री राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती.

सदर परस्पर विरोधी टोळयांतील हद्दपार इसम हे टोळीने फलटण तालुका परिसरामध्ये सातत्याने गुन्हेगारी कारवाया चालु ठेवत असल्याने त्यांचेवर वेळोवेळी फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिष्टरी दाखल करण्यात आले आहेत. हद्दपार टोळयांतील इसमांचेवर दाखल गुन्हयांमध्ये त्यांना वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचे गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या टोळयांचा उपद्रव होत होता आशा टोळयांवर सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

मा.समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्या समोर वरील टोळयांमधील इसमांची सुनावणी होवुन त्यांनी सदर टोळयांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा व पुणे जिल्हयातुन दोन वर्षे कालावधीकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन म.पो. का. क ५५ प्रमाणे ३७ उपद्रवी टोळयांमधील १२८ इसमांना, म.पो. का. क ५६ प्रमाणे ३८ इसमांना, म.पो.का.क ५६ प्रमाणे ०४ इसमांना असे एकुण १७० इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन आगामी काळात सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवण्याकरीता सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का,एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.

याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोहवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ केतन शिंदे, मपोकॉ अनुराधा सणस, फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोउनि श्री गोपाल बदने, पोहवा वैभव सुर्यवंशी यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें