सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुवर्ण परीस स्पर्श फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.
फलटण प्रतिनिधी : सुवर्ण परिस स्पर्श फाउंडेशन जाधववाडी फलटण यांच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रमात पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांच्या विविध स्पर्धेत सह संपन्न झाला.
यावेळी सुवर्ण परीस स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण मॅडम यांनी अपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले समाज घडवण्यासाठी महिलांना अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई यांच्या विचाराने पुढे जावे लागणार तसेच महिलांनी सबल होणे आजच्या काळाची गरज आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे समाजात पुढे जाताना मुलींसाठी आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात असते असेही फाउंडेशनच्या अध्यक्षा यांनी सांगितले.
फलटण पंचायत समितीच्या मा. सभापती रेश्माताई भोसले आणि सातारा जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल पाटील मॅडम यांनी सर्व महिलांना व्यवसाय मार्गदर्शन व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेचं प्रकल्प अधिकारी शितल पाटील मॅडम सुवर्ण परिस स्पर्श फाउंडेशन चे कौतुक करताना या सुवर्ण परिस फाउंडेशने आपल्या कामाच्या माध्यमातुन फाउंडेशनचे नाव फलटण तालुकाच नाही तर फलटण तालुक्याच्या बाहेर सुद्धा या संस्थेने नाव लौकिक मिळवलेले आहे असे सांगितले.
तसेचं रेष्माताई भोसले यांनी मी फाउंडेशनच्या अध्यक्षा पठाण मॅडम याचे काम पाहत असते त्यांचे काम पाहुन खात्रीपूर्वक सांगावेसे वाटते मोजकेच काही महिला असतात जे समाज हितासाठी वाहुन घेतात त्यातीलचं एक पठाण मॅडम असे गौरवोद्गार रेष्माताईंनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी सभापती रेशमाताई भोसले व प्रकल्प अधिकारी शितल पाटील मॅडम, पुनमताई भिसे, ट्रेनर सोफिया पटवेकर व सुवर्ण परिस स्पर्श चे स्टुडन्ट आधी सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळेस विविध मनोरंजनाचे कार्यक्रमासह हळदी कुंकू च्या सेल्फीने सर्वांचे लक्ष वेधले.













