सोनगाव च्या उपसरपंच पदी राजे गटाच्या सौ सुजाता लांडगे यांची बिनविरोध निवड
सोनगाव (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेगटाच्या सौ सुजाता कोंडीबा लांडगे यांची बिनविरोध निवड झाली.
अध्यक्षस्थानी नवनियुक्त सरपंच सौ. राणीताई संतोष गोरवे या होत्या.
निवड निरीक्षक म्हणून विडणी महसुल मंडल अधिकारी श्री जाधव साहेब यांनी काम पाहिले. या कामकाजावेळी राजे गटाचे एकूण ९ पैकी ७ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
ही निवड श्री पोपटराव बुरुंगले विद्यमान चेअरमन सोनगाव वि का स सोसायटी व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, श्री जयाप्पा बेलदार, संदीप पिंगळे, विकास बेलदार, भीमदेव बुरुंगले मा चेअरमन फलटण तालुका दुधसंघ, राजेश निकाळजे, जयवंत खरात, अजित कांबळे, रामहरी पिंगळे, अरुण लांडगे – तंटामुक्ती अध्यक्ष, या गटप्रमुखांच्या मार्गदर्शनानुसार झाली.
मावळते उपसरपंच सौ संगीता हनुमंत गोरे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे उपसरपंचपद रिक्त झाले होते.
निवडीवेळी सौ ज्योत्सनाताई जगताप,सौ कोयना पिंगळे, सौ रंजना कांबळे, संतोष गोरवे, लखन पिंगळे, रमेश जगताप, गणेश कांबळे, गणेश नामदास, पवन भोसले, कोंडीबा लांडगे, धर्मराज लांडगे, दीपक लांडगे, राजेंद्र लांडगे, सोमनाथ लांडगे, चैतन्य लांडगे, अभिजित आडके, मदन लांडगे, महेश लांडगे, हनुमंत निकाळजे, मधुकर निकाळजे , विकास जाधव, संतोष मोरे, राजेंद्र भोसले, विजय भोसले, सुरेश पवार, जितेंद्र आडके, दिलीप आडके, शिवाजी लांडगे, अशोक जगताप, अजिंक्य बुरुंगले, संकेत बुरुंगले, दादा बंडगर, चैतन्य पिंगळे, संजय वाघ , सचिन लांडगे, अमित निकाळजे, साजन भोसले, साजन चव्हाण, भालचंद्र वाघमोडे, कानिफनाथ वाघ, रमेश वाघ, अरविंद लवटे, दत्तात्रय ननावरे, भगवान जगदाळे, राहुल यादव, सुरेश गेजगे, सागर पाटोळे, अतुल पाटोळे, बाळकृष्ण रिटे, सुनिल रिटे, राजेंद्र आडके, शिवाजी ढवळे, बाळू बल्लाळ, बापूराव गोरवे, महादेव चव्हाण, सचिन चव्हाण, रमेश मदने, ग्रामसेवक रामचंद्र नाळे , व बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होते.
या निवडीनंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , Kingdom रघुनाथराजे नाईक निंबाळकर व मा आमदार दीपक चव्हाण यांनी नवनियुक्त उपसरपंच यांना शुभेच्छा दिल्या.













