रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आधार प्रमाणीकरण ई-केवायसी अनिवार्य

रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आधार प्रमाणीकरण ई-केवायसी अनिवार्य

किरण शिंदे – रायगड

दि. 30- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kye) करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.

लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-kyc) करण्याकरिता गावोगावी कॅम्प आयोजीत केले आहे. या करिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभाथ्यांनी आपल्या नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kyc) करावयाचे आहे. सदरील प्रक्रिया दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावयाची असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठयाचा ठसा व आधार नंबर देऊन ई-केवायसी (e-kyc) करावी. ई-केवायसी (c-kyc) केले नाही, तर दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ नंतर धान्य दिले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी कॅम्प चा लाभ घ्यावा.या संदर्भात सर्व लाभार्थी व रास्तभाव धान्य दुकानदार यांना दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ पूर्वी १००% कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.

तसेच जिल्हयातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांना सुचित करण्यात येते की, त्यांनी प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेस अन्नदिन साजरा करुन लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरु करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये दर महिन्याच्या १५ तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावे. अशा सक्त सूचना देण्यात येत आहेत.

तसेच वन नेशन वन रेशनकार्ड अंतर्गत (Portability) राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानामध्ये जाऊन अन्नधान्याची उचल करीत आहेत. त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानामध्ये ई-केवायसी (e-kyc) करुन घ्यावी. अन्यथा आपल्या गावी रास्तभाव धान्य दुकानात जाऊन केवायसी (e-kyc) करावी.

केद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत/असघंटीत कामगारांना मिळणार

शिधापत्रिकेचा लाभ

केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत/असंघटीत कामगार ज्यांच्याकडे अद्याप रेशनकार्ड नाही, अशा कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेअंतर्गत तातडीने शिधापत्रिका वितरीत करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत स्थलांतरित /असंघटीत कामगारांना उत्पन्नानुसार शिधापत्रिका देण्याची कार्यवाही जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये सुरु आहे. त्यानुसार ज्या व्यक्तीनी स्वतःचे नाव ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत केलेले आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रिकेचा लाभ नाही, अशा व्यक्तींनी आवश्यक त्या कागदपत्रांसह जवळच्या तहसिल कार्यालयामध्ये संपर्क करुन शिधापत्रिका प्राप्त करुन घ्यावी.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें