चिकन, अंडी खाणे सुरक्षित,सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण नाही  

चिकन, अंडी खाणे सुरक्षित,सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण नाही

सातारा दि. 29: सातारा जिल्ह्यात बर्ड फ्लू या आजाराचे बाधित कुक्कुट पक्षी आढळुन आले नाहीत. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी सतर्क झाला असून पूर्वतयारी करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी दिली आहे.

बर्ड फ्ल्यू आजाराबाबत नागरीकांनी घाबरुन न जाता चिकन व अंडी शिजवून खाल्ल्याने कोणताही रोग उद्भवत नाही व शिजवलेले मास व अंड्यामध्ये जिवाणू व विषाणू जिवंत राहत नाहीत. त्यामुळे नागरीकांनी चिकन व अंडी शिजवून वापर करावा.

जिल्ह्यात कोठेही कुक्कुट पक्षी किंवा इतर पक्षांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात कोंबड्या किवा इतर पक्षी मरतुक दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखाना, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी सपर्क साधावा.¸

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें