शिवसृष्टीचे काम तात्काळ पूर्ण करून “ऐतिहासिक” वाचनालय सुरू करा सँभाजी सेनेची मागणी

शिवसृष्टीचे काम तात्काळ पूर्ण करून “ऐतिहासिक” वाचनालय सुरू करा सँभाजी सेनेची मागणी

 

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

संभाजी सेनेने संभाजी सैनिकांसह शिवप्रेमींना सोबत घेऊन वर्षेनुवर्षे विविध रचनात्मक आंदोलने करून लढा दिल्यामुळे उभारला गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस सुरू केलेले शिवसृष्टीचे काम अनेक वर्षांपासून अपूर्णच आहे, तेथील एम्बॉस प्रकारातील भित्तीचित्रे (म्युरल्स) अद्याप लावलेले नाहीत, अशी जी काही कामे अपूर्ण आहेत ते तात्काळ सुरू करून पूर्ण करावेत तसेच शिवसृष्टीचा मधील भाग पूर्णतः मोकळा आहे, अगदी ओपन टू स्काय आहे, तरी तो ओपन टू स्काय बंद करून त्या व्यर्थ वाया जाणाऱ्या जागेवर ऐतिहासिक वाचनालय सुरू करून तिथे स्वराज्य संकल्पक छञपती शहाजी राजे, राजमाता जिजाऊ माँ साहेब, स्वराज्य निर्मात्ये छञपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छञपती संभाजी राजे तसेच शिव-शंभुंचे सहकारी सवंगडी मावळ्यांचा इतिहास असे शिवचरित्रावर आधारित ऐतिहासिक पुस्तकं ठेऊन ठराविक वेळांमध्ये वाचक वर्गासाठी ते वाचनालय सुरू ठेवावे तसेच शिवसृष्टी देखील शिवभक्तांना बघण्यासाठी खुली ठेवावी अशी मागणी संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी दिनांक २३ जानेवारी रोजी दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें