य. ना. चव्हाण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर उत्साहात संपन्न

य. ना. चव्हाण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर उत्साहात संपन्न

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):-
येथील नानासाहेब य.ना चव्हाण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे या वर्षीचे शिबिर तालुक्यातील जामदा येथे आयोजित करण्यात आले होते. दि. 9 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान सुरू असणारे हे शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला होता. शाळा परिसराची स्वच्छता, गावातील परिसराची स्वच्छता, तसेच जामदा धरण परिसरातील व धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहीम विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात आली. तसेच नवीन वृक्ष लागवड जुन्या वृक्षांचे जतन व संवर्धन व इतर श्रमदान श्रमसंस्कार शिबिरामध्ये करण्यात आले. आठ दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही मोठा सहभाग नोंदवला होता. स्टेज कार्यक्रम, खांदेशी पाऊली, कानबाईचे गाणे तसेच इतर नृत्य प्रकार विद्यार्थ्यांमार्फत सादर करण्यात आले. दुपारी श्रमदान करून आल्यानंतर विद्यार्थी अनेक गाण्यांवर ताल धरून नाचून गाऊन आनंद व्यक्त करत होते. जामदा गावामध्येही विद्यार्थ्यांमार्फत अनेक नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रेक्षकांच्या भूमिकेत गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आठ दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण उपाययोजना शिबिरामध्ये करण्यात आली होती. याबाबत विद्यार्थिनींनी व त्यांच्या पालकांनीही कॉलेज प्रशासनाचे आभार मानले, व समाधान व्यक्त केले. या शिबिरासाठी प्राध्यापक राजू निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें