पुनवडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पुनवडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

खंडाळा प्रतिनिधी 

गणेश गुरव : जावली तालुक्यातील पुनवडी प्राथमिक शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मदत करणारे, विद्यार्थी हित लक्षात घेऊन सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे महालक्ष्मी मेडिकल स्टोअर्स मुंबईचे मालक कै.निलेश शांतीलाल मेहता यांचे स्मरणार्थ दातृत्वशील व्यक्तिमत्व श्री.महेश शांतीलाल मेहता सौ.पन्ना महेश मेहता,श्री.अश्विन शांतीलाल मेहता,श्री संतोष पांडुरंग पार्टे यांचे वतीने पुनवडी गावातील अंगणवाडी ते इयत्ता 8 वीपर्यंतच्या 29 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्य यांची भरघोस मदत करण्यात आली.*     

तसेच पुढील काळात शाळेसाठी गेट,विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट ड्रेस व शालेय परिसर सुशोभीकरणासाठी रंगरंगोटी यांची मदत करण्याचे ही जाहीर केले.शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी शिक्षण आणि खेळ यातून आपण यशाचे शिखर गाठू शकतो असा संदेश दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विशाल दळवी यांनी केले व आभार सहशिक्षिका रंजना भोसले यांनी मानले.याप्रसंगी केडंबे केंद्राचे केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप,सरपंच सुरेश पार्टे,ग्राम.सदस्य संजय पार्टे, सविता पार्टे ,शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्षा कविता पार्टे,उपाध्यक्ष रामचंद्र उंबरकर,मारुती पार्टे,किसन पार्टे,दिलीप जंगम अंगणवाडी सेविका संजना पार्टे आश्विनी पार्टे,द्रौपदा पार्टे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें