मिस,युनीव्हर्स, प्रेरणा धाबर्डेचा पिंपळगाव( भोसले) गावात सत्कार….
.. देशपातळीवर नावलौकिक मिळवल्याने प्रेरणाचे सर्वत्र कौतुक…
…भीमा कोरेगाव शौर्यगाथा “रमाबाई”महानाट्य चित्रपटात अभिनेत्री म्हणून मिळाली संधी
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे
ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) येथील नानाजी मेश्राम यांची मुलगी डॉ उदय धाबर्डे यांची पत्नी प्रेरणा धाबर्डे हीने आपल्या अथक प्रयत्नातून सौंदर्य किताब स्पर्धेत सहभाग घेतला. आणि सौंदर्य किताब पटकवुन मिस छत्तीसगड, मिस इंडिया, मिस युनिव्हर्स बनली. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) हा प्रेरणाचा जन्मगाव होता. त्यामुळे प्रथमच स्वगावी परतल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने प्रेरणाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. देश पातळीवर नावलौकिक मिळवल्याने प्रथमआगमन प्रित्यर्थ पिंपळगाव (भोसले) गावातील नागरिकांच्या वतीने सत्कार सोहळा पार पडला. त्यानंतर भिमा कोरेगाव शौर्यगाथा महानाट्यप्रयोगात “रमाबाई”चित्रपटात अभिनेत्री म्हणून अभिनेत्री म्हणून सुद्धा काम करण्याची संधी तिला प्राप्त झाली. त्याबद्दल प्रेरणाचे मनस्वी आभार सुद्धा गावकऱ्यांनी व्यक्त केले. या सत्कार समारंभा प्रसंगी सरपंच सुरेश दुनेदार, उपसरपंच जगदिश बनकर,माजी सरपंच उद्योगजग सुनील धांडे,गुड्ड बगणारे,देविदास गडे,वासनीक बाबु,धनीराम बनकर,,पुनीत बनकर,दादाजी मेश्राम,चंद्रमुनी बोदेले,यसवंती मेश्राम,सुरेश बनकर,मंगेश गणविर,नामदेव कांबळे,किशोर नंदेश्वर, समस्त ग्रामवाशी उपस्थीत होते.











