डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
येथील प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या सचिव शुभांगी पूर्णपात्रे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विलास भोई व सत्यजित तांबे मित्र मंडळ अध्यक्ष योगेश पाटील होते. मंचावर मुख्याध्यापक रमेश सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र वराडे, आनंद जगताप उपस्थित होते. यावेळी सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून शाळेला संगणक सेट भेट देण्यात आले. योगेश पाटील यांनी मनोगतात म्हटले की विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शालेय उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विकासाची कास धरावी सोबत त्यांनी आपल्या शालेय जिवनातील आठवणी जाग्या केल्या. अध्यक्षीय मनोगतात शुभांगी पूर्णपात्रे यांनी विद्यार्थ्यांनी नेहमी चौकस राहून आपल्या अवतीभवती असणाऱ्या सर्व घटकांमागे विज्ञान आहे याबाबत विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यात सहभागी विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी व माहिती मान्यवरांनी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यात विद्यालयातील शिक्षिका मोनाली पाटील व जयश्री गांगुर्डे यांनीही प्रकल्प सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी केले, सूत्रसंचालन मोनाली पाटील यांनी केले तर आभार सचिन पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.











