श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखान्याने प्रति टन रुपये ३१००/- उचल जाहीर
उचल ऊस पुरवठादार यांच्या बँकखाती टप्याटप्याने वर्ग करण्यास सुरुवात
फलटण प्रतिनिधी:
चालू गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये गाळप झालेल्या ऊसाला श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखान्याने प्रति टन रुपये ३१००/- उचल जाहीर केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. श्री. बाळासाहेब शेंडे यांनी दिली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ व भागीदारी सभेमध्ये मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरसाहेब यांचे मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेण्यात आला. एफआरपीच्या सुत्रानुसार कारखान्याची एफआरपी रु. २८२२.५० इतकी असलेने टनाला अधिकचे रु.२७७.५० जादा अदा करणेत येत असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा. डॉ. श्री. बाळासाहेब शेंडे यांनी दिली.
त्यानुसार सन २०२४ -२५ या गाळप हंगामामध्ये दिनांक १५.११.२०२४ ते ३०.११.२०२४ या कालावधीमध्ये कारखान्यास गाळपास आलेल्या ६३,५९३.३८५ मे. टन ऊसास प्रति.मे.टन रुपये ३१००/- प्रमाणे होणारी एकूण रक्कम रु. १९,७९,३९,४९३.०० चे ऊस पेमेंट दिनांक ०७/०१/२०२५ रोजी ऊस पुरवठादार यांचे बैंकखाती वर्ग करणेत आलेले आहेत.
तेव्हा ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला सर्व ऊस श्रीराम जवाहर साखर कारखान्यास गळीतास द्यावा असे अवाहन श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, मा. डॉ. श्री. बाळासाहेब शेंडे यांनी ऊस उत्पादकांना केले आहे.











