लाच स्विकारताना कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

लाच स्विकारताना कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

फलटण प्रतिनिधी

फलटण दि. ८ जानेवारी २०२५ : जागेसह घराची सातबारा उताऱ्यावर मीच नोंद केली आहे याचा मोबदला म्हणून ५०० रुपयांची लाच स्विकारताना फलटण तलाठी कार्यालयातील कोतवाल यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. दिपक दौलतराव उदंडे (वय ४९) (कोतवाल) सजा फलटण रा. कसबा पेठ, फलटण) असे अटक करण्यात आलेल्या कोतवालाचे नाव असून सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांचे पत्नीचे नावे फलटण येथील दीड गुंठे जागेसह खरेदी केलेल्या घराची सातबारा वरती नोंद ही मीच करून घेतली आहे असे सांगून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून १ हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती ५०० रुपये मागणी करून ती स्विकारताना दिपक दौलतराव उदंडे या कोतवालास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. फलटण शहर पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें