भारतीय वायुसेनेच्या ‘सूर्यकिरण’ एअर शोचे २६ नोव्हेंबरला साताऱ्यात आयोजन

भारतीय वायुसेनेच्या ‘सूर्यकिरण’ एअर शोचे २६ नोव्हेंबरला साताऱ्यात आयोजन

सातारा : ‘सैनिकांचा जिल्हा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या शौर्यशाली लष्करी परंपरेच्या स्मरणार्थ सातारा जिल्ह्याच्या पर्यटन संवर्धनासाठी व लष्करी वारशाचा सन्मान करण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमचा एअर शो व ‘एअर वॉरियर ड्रिल टीम’चे सादरीकरण गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी साताऱ्यात होणार आहे. २६/११ रोजीच्या मुंबई हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्याच्या स्मरणदिनीच हा कार्यक्रम आयोजित होत आहे.

महाराष्ट्रातील हा पहिलाच एअर शो देशातील पहिल्या सैनिक स्कूलच्या, म्हणजेच सैनिक स्कूल, सातारा येथील फुटबॉल मैदानावर दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते १ वा. होणार असून, श्रीमंत छत्रपती शाहू स्टेडियम येथे सायं ५ ते ७ या वेळेत वायुदलाचे बँड पथक व सैन्य दलाचे संचलन होईल. यातून विद्यार्थी व युवकांना वायुसेनेची शिस्त व कौशल्य अनुभवता येईल, संरक्षण दलातील करिअरसाठी प्रेरणा मिळेल आणि जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल.

या कार्यक्रमास सर्व नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक व देशप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

समाज बांधव-भगिनींसह सायकल वारीतील सायकलस्वारांनी धरला विठ्ठलनामाच्या गजरात नृत्याचा ठेका; क्रांतिसिंह नाना पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी, शाल-श्रीफळ व पुष्पहार देऊन सायकलस्वारांचा सन्मान!

दिनदर्शिकांमध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या तीन महत्त्वाच्या दिवसांची अचूक नोंद प्रसिद्ध व्हावी ; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांचे दिनदर्शिका प्रकाशकांना आवाहन

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

दुर्गम भागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निमजे यांचे बडतर्फी प्रकरणी उच्च न्यायालयात 👉 उच्च न्यायालयाने राज्य शासनासह गडचिरोली जिल्हा परिषदेला बजावली नोटीस 👉 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिंदेचे प्रताप चव्हाट्यावर?