जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या भोंगळ कारभार.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या भोंगळ कारभार.
👉 AVB माझा चालविणार सतत पंधरा दिवस कहाण्यांची श्रृंखला.
👉 डॉ प्रताप शिंदे यांच्या विविध भोंगळ प्रतापाची सुरस कहाण्या वाचकांना मिळणार
नागपूर (चक्रधर मेश्राम) दि. २३ ऑक्टोबर २०२६-
गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वेसर्वा जबाबदार असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या भोंगळ प्रतापाच्या सुरस कहाण्या एव्हीबी माझा मध्ये सतत पंधरा दिवस वाचकांना वाचायला मिळणार आहेत. एव्हीबी माझा च्या माध्यमातून सतत पंधरा दिवस वेगवेगळ्या भागांची कहाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यात औषध घोटाळा, किंमतीत असलेल्या तफावती,❓ न्यायालयीन आदेशाची पडताळणी न करता भाकरोंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संयुक्ता निमजे यांचे हेतुपुरस्सर बडतर्फ प्रकरण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे डोळे बंद करून जिल्ह्यातील आरोग्य सेवा चालवितात❓, शिस्तबद्ध पध्दतीने आरोग्य सेवेचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बेकायदेशीर , नियमबाह्य कामे करण्यासाठी दडपण का❓पै….खाऊ… साठी मर्जीतील अधिकाऱ्यांची पै..खा ठिकाणी नियमबाह्य वर्णी❓ जिल्ह्यातील माता – बाल मृत्यूच्या प्रमाणात वाढ❓प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सोयी सुविधांचा अभाव.❓औषध घोटाळा, तज्ञ डॉक्टरांचा अभाव? मॅटरनिटी मृत्यूच्या प्रमाणात वाढ का झाली❓ होम डिलीवरी च्या प्रमाणात वाढ का झाली❓असामाजिक स्वरूपाचे गंभीर गैरवर्तन, लैंगिक आणि मानसिक छळाबाबत प्राप्त झालेल्या प्रतापांच्या तक्रारीचे सविस्तर विवरण एव्हीबी माझाच्या माध्यमातून लवकरच पंधरा भागात उघड होणार आहे. यासाठी जिल्हा परिषद परिसरातील अनेक वाचक या भोंगळ कारभाराच्या कहाण्यांची आतुरतेने वाट पहात आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील आरोग्य विषयक अनेक प्रकरणाचा तपशील विस्तृतपणे वाचायला मिळणार आहे. यापुर्वी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजिता वाडीघरे प्रकरण थोडेसे गाजले होते. तेव्हापासून जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे वादग्रस्त ठरले आहेत. आणि त्यांच्या कहाण्या हळूहळू बाहेर पडून एव्हीबी माझाच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध होणार आहेत. हे महत्त्वाचे!!अन्यायाचा विरोध करण्यासाठी डिएचओ डॉ. प्रताप शिंदे यांच्या भोंगळ कारभाराविरोधात निवेदन करणे चुकीचे आहे का? मग त्यांच्याच चौकशीचे आदेश का.? हा अधिकाराचा गैरवापर नाही का? त्यामुळे डॉ. प्रताप शिंदे यांना तात्काळ बडतर्फ का करण्यात येऊ नये. महीला आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उतरवून बोलण्याची डिएचऒ यांची भाषा असेल तर जिल्ह्यात आरोग्य सेवा देण्याची मानसिकता राहणार का? जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आरोग्य अधिकारी, डॉक्टर, सिएचओ तसेच इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने दिवसेदिवस आरोग्य विषयक निर्माण झालेल्या अनेकविध समस्यांना डॉ. प्रताप शिंदे हे जबाबदार नाही का.? यासारख्या अनेक समस्या जिल्ह्यात ठिकठिकाणी ऐकायला मिळतात. आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्याची महत्त्वाची जबाबदारी कुणाची?

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें