विधानपरिषद पदवीधर मतदार संघात प्रा. आनंद मेश्राम यांना सैनिक समाज पार्टीचा पाठिंबा.

विधानपरिषद पदवीधर मतदार संघात प्रा. आनंद मेश्राम यांना सैनिक समाज पार्टीचा पाठिंबा.
🎯 विविध पैलू खंबीर नेतृत्वाचे धनी आनंद मेश्राम विधानपरिषदेचे नेतृत्व करणार. ॲड. शिवाजी डमाळे यांचे खंबीर विचार.
🎯 पदवीधरांच्या हक्कांसाठी, सन्मान आणि न्यायासाठी बुलंद आवाज उठविणार – प्रा. आनंद मेश्राम
गडचिरोली (जिल्हा प्रतिनिधी) दि. १८/१०/२०२६:- सोशल मीडियाच्या युगामध्ये राजकीय नेत्यांच्या सभेला रोजंदारीवर लोकांना आणुन फुकटचे शक्ती प्रदर्शन दाखविण्याचा जमाना संपला आहे.
माणुस स्वतंत्र विचारांचा प्राणी असल्याने केवळ देवापुढेच नतमस्तक होत असतो! ९० टक्के भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वाटते? की आपण सणासुदीला, गणेशोत्सव, नवरात्रीच्या उत्साहात बॅनरबाजी केल्यामुळे लोकं आपल्याला मानत असतील? सण आल्यावर लगेच विनापरवाना बॅनरचे पेवच फुटलेले दिसून येते? प्रशासन पण गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या दबावात जाऊन शहराचे विदृपीकरण झाल्याचे पाहून न दिसल्यासारखे करत असतील? आम समाजातील नागरीकांना मात्र त्रास सहन करावा लागतो?चुक अगदी चुकीचे आहे. नेत्यांचे अंधभक्त आपल्याला जनता मानत असल्याचा दिखावा करत असले तरी, त्यांचे कार्यकर्ते, भयग्रस्त किंवा लालचग्रस्त असतील? म्हणुन नेत्यांचे बॅनर लावण्यासाठी पुढाकार घेत असतील . सध्या आंदोलनाला, जरी लोकं स्वयंस्फूर्तीने येत असले तरी, त्यांच्या मागे जनता असते. असं अजिबात नाही. या सर्व समस्यांवर एकमेव रामबाण उपाय सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक द्वारा जनतेपुढे ठेवण्यात आला आहे. नैसर्गिक दृष्ट्या स्वतंत्र विचाराचे असुन स्वतंत्र भारताचे नागरिक आहात .राजकारणात चाललेला खेळ खंडोबा तुम्ही उघड्या डोळ्याने पहात बसूं नका.
सैनिक समाज पार्टीच्या व्यासपिठावर येऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी आणि
जनलोकतंत्र आणण्यासाठी, सैनिक समाज पार्टीचे विचारांचे खास सरकार सत्तेवर बसवण्याच्या ऐतिहासिक कार्याला हातभार लावण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या ideology बरोबर जोडण्याचा स्वतंत्र विचाराने निर्णय घेतलाच पाहिजे. त्यामुळे नागपूर विधान परिषद मतदारसंघातून उच्च विद्याविभूषित असलेले उमेदवार प्रा. आनंद मेश्राम यांच्या शिक्षण, रोजगार, समान संधी, विकसित महाराष्ट्र, शेतकरी व कामगार विषयक कार्य, शैक्षणिक आणि उच्च शिक्षित युवकांना रोजगार निर्मिती, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची कामगिरी विचारात घेऊन सैनिक समाज पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. मतदारांनी आपले मत प्रा. आनंद मेश्राम यांना देऊन प्रचंड मतांनी निवडून विधान परिषदेचे नेतृत्व करण्यासाठी संधी द्यावी. असे मत ॲड शिवाजी डमाळे ,जनसचेतक महाराष्ट्र सैनिक समाज पार्टी यांनी कळविले आहे..

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें