माळजाई मंदिर परिसरात पशुपक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था!

एव्हीबी माझा | दैनिकासाठी संपादित बातमी

माळजाई मंदिर परिसरात पशुपक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था!

प्रमोद (अण्णा) निंबाळकर यांच्या पाठिंब्याने सामाजिक उपक्रम; लायन्स क्लबच्या माध्यमातून व्यापक सहकार्याचे आश्वासन

 फलटण प्रतिनिधी : माळजाई मंदिर परिसर : यंदा कमी प्रमाणात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ऑक्टोबर महिन्यापासूनच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. आगामी काळातील संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन पशुपक्ष्यांची तहान-भूक भागविण्यासाठी लायन्स क्लब संचलित माळजाई मंदिर व उद्यान परिसरात चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ‘आपण निसर्गाचे काही देणे लागतो’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष तथा उद्योजक प्रमोद (अण्णा) निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निसर्गप्रेमी रणजित पिसाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी महासेवा सहयोग फाउंडेशनचे संस्थापक ॲड. प्रशांत निंबाळकर, श्रीरामदूत सेवा प्रतिष्ठानचे नवनाथ पवार, माळजाई मंदिर व उद्यान समितीचे कार्याध्यक्ष महेशशेठ गरवालीया यांच्यासह अनेक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पशुपक्ष्यांच्या सेवेसाठी सामाजिक पुढाकार

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पाण्याची उपलब्धता हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत माणसांबरोबरच पशुपक्ष्यांच्याही अन्न-पाण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुक्या जीवांना पिण्यासाठी पाणी आणि अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंदिर परिसरात ही व्यवस्था करण्यात आली.

निसर्गातील प्रत्येक जीवाचे अस्तित्व महत्त्वाचे असून, पशुपक्ष्यांची तहान-भूक भागविण्यासाठी समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

लायन्स क्लबच्या माध्यमातून व्यापक सहकार्याचे आश्वासन

या सामाजिक उपक्रमाचे माळजाई मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांनी आणि नागरिकांनी कौतुक केले. माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद (अण्णा) निंबाळकर यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व संस्था, पदाधिकारी आणि युवकांचे आभार मानले. तसेच पशुपक्ष्यांच्या सेवेसाठी राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांना लायन्स क्लबच्या माध्यमातून भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले.

माणुसकी, निसर्गप्रेम आणि जीवमात्रांप्रती संवेदनशीलता यांचा संगम असलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला आहे. पशुपक्ष्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

एव्हीबी माझा | जनहितासाठी, समाजहितासाठी

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें