चाळीसगावं रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा – रयत सेनेचे भुसावळ रेल्वे विभागाचे डी आर एम यांना निवेदन

चाळीसगावं रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा – रयत सेनेचे भुसावळ रेल्वे विभागाचे डी आर एम यांना निवेदन

चाळीसगावं प्रतिनिधी – महाराष्ट्र एक्सप्रेस व देवळाळी भुसावळ मेमू ची पुर्ववत वेळ करण्यासह कर्नाटक एक्सप्रेस, साकेत एक्सप्रेस, ओखा रामेश्वर एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस ला चाळीसगावं रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा तसेच धुळे ते पुणे नवीन रेल्वे गाडी सुरु करण्यात यावी यासह नागपूर ते पंढरपूर ही रेल्वे गाडी भुसावळ,चाळीसगाव मनमाड मार्गे पंढरपूर आठवड्यातुन दोन दिवस सुरु करण्याची मागणी भुसावळ रेल्वे विभागाचे डी आर एम पुनीत अग्रवाल यांच्या कडे रयत सेनेच्या वतीने दि 15 रोजी चाळीसगावं रेल्वे स्थानकावर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की चाळीसगाव शहराचा झपाट्याने विस्तार झाला आहे येथून विद्यार्थी, नोकरदार वार्ड, व्यापारी वर्ग जळगाव, भुसावळ, नाशिक, मुंबई आदी ठिकाणी प्रवास करतो मात्र त्यामानाने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर लांब पल्याच्या गाड्या थांबत नाही व इतर गाड्या वेळेवर नाहीत म्हणून नवीन गाडयांना थांबा द्यावा तसेच कर्नाटक एक्सप्रेस गाडी क्र 12627/12628 या रेल्वे गाडीला चाळीसगावं रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणे सोपे होईल शिवाय बेंगलोर येथे आयटी हब असल्यामुळे विद्यार्थी तेथे शिक्षण घेतात व नोकरी देखील करतात तसेच दक्षिण भारतातील देव दर्शनासाठी कर्नाटक एक्सप्रेस रेल्वे गाडीला थांबा दिल्यास चाळीसगाव सह छत्रपती संभाजी नगर व धुळे जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध होणार आहे,गोवा एक्सप्रेस गाडी क्र 12779/12780 या रेल्वे गाडीला चाळीसगावं रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास खानदेशातील हजारो प्रवाशांना पर्यटनासाठी जाता येईल, येथील व्यापाऱ्यांना व्यापारासाठी तसेच खरेदीसाठी दिल्ली जावे लागते म्हणून गोवा एक्सप्रेस ला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा यामुळे हजारो प्रवाशांना या गाडीची सुविधा उपलब्ध होणार आहे, ओखा रामेश्वर गाडी क्र 16733/16734 या साप्ताहिक धावणाऱ्या रेल्वे गाडीला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तसेच नागद यासह धुळे जिल्ह्यातील प्रवासी तसेच चाळीसगाव तालुक्यातील प्रवाशांना दोन धाम दर्शन व तिरुपती दर्शनासाठी जाण्यासाठी या रेल्वे गाडीची सुविधा उपलब्ध होईल,साकेत एक्सप्रेस गाडी क्र 22183/22184 या रेल्वे गाडी ला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा दिल्यास अयोध्या येथील प्रभू श्रीरामाचे दर्शन होणार असल्यामुळे प्रवाशांच्या सुवेधेसाठी साकेत एक्सप्रेस ला चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, नागपूर कोल्हापूर गाडी क्र 11403/11404 ही रेल्वे गाडी अकोला, परभणी ते लातूर मार्गे कुर्डवाडीहुन पंढरपूर जाते याच गाडीला नागपूर,भुसावळ, चाळीसगाव ते मनमाड मार्गे पंढरपूर आठवड्यातून दोन दिवस सुरू केल्यास खानदेशातील हजारो भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाची असल्यामुळे ही गाडी सुरू करण्यात यावी, खानदेशातील विद्यार्थी हे पुणे येथे शिक्षण घेतात मात्र पुणे येथे जाण्यासाठी एकमेव महाराष्ट्र एक्सप्रेस असल्यामुळे हजारो प्रवाशांना या गाडीला वर्षभर प्रवाशाची गर्दी असते त्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करणे शक्य होत नाही म्हणून रेल्वे विभागाच्या वतीने धुळे ते पुणे नवीन रेल्वे गाडी सुरू करून धुळे व जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुणे येथे जाण्यासाठी धुळे ते पुणे रेल्वे सुरू करून सुविधा उपलब्ध करून द्यावी, महाराष्ट्र एक्सप्रेस गाडी क्र 11039 या रेल्वे गाडीची वेळ चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सकाळी 5 वाजून 58 मिनिटांनी ते 6 वाजेची असून या वेळेत बदल करून सकाळी 7 ते 7 – 30 वाजे दरम्यान या गाडीची वेळ केल्यास जळगाव येथे नोकरी व शिक्षणासाठी अपडाऊन करण्याऱ्या हजारो प्रवाशांना सोयीची होणार असल्यामुळे गाडीचे वेळ पूर्ववत करावी, देवळाली भुसावळ मेमो गाडी क्र 11113 या गाडीची वेळ सकाळी पूर्ववत केल्यास जळगाव येथे नोकरी निमित्त व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या गाडीने प्रवास करणे हे खूप सोयीचे होईल म्हणून या गाडीची वेळ पूर्ववत करावी, चाळीसगाव रेल्वे स्थानक हे तीन जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेले रेल्वे स्थानक असल्यामुळे लाखो प्रवासी येथून प्रवास करतात मात्र पाहिजे तितक्या गाड्या या रेल्वे स्थानकावर थांबत नसल्यामुळे चाळीसगाव व धुळे जिल्ह्यातील प्रवाशांना रेल्वेची सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे आपण रयत सेनेच्या वतीने केलेल्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि प्रवाशांना रेल्वेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, येत्या 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत रयत सेनेने केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास चाळीसगाव रेल्वे टिकीट ऑफिस बाहेर प्रवाशांना सोबत घेऊन रयत सेना बेमुदत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे भुसावळ विभागाचे डी आर एम पुनीत अग्रवाल यांना रयत सेनेच्या वतीने दि 15 ऑक्टोबर 2026 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे, निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी एन पाटील, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड,तालुका अध्यक्ष प्रदीप मराठे, शहर अध्यक्ष शिवाजी गवळी, शहर उपाध्यक्ष प्रकाश गवळी, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, संघटक दिपक देशमुख,शहर उपाध्यक्ष सतीश पवार, हर्षवर्धन इंगोले, प्रदीप मोरे,पवन पवार,प्रदीप पवार तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे सुभाष बजाज यांच्यासह रयत सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें