माध्यमिक विद्यालय बहाळ येथे रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी वतीने सायकल वाटप व संगणक कक्षाचे उद्घाटन
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
तालुक्यातील बहाळ येथील माध्यमिक विद्यालयात रोटरी तर्फे कै. मधुकर हरी शिरूडे यांच्या स्मरणार्थ गरजू व वंचित मुलींना ११६ सायकली वाटप करण्यात आले. तसेच शाळेसाठी अद्ययावत संगणक कक्ष (१० संगणक ) रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगम व स्वागत सेवालय तर्फे उभारण्यात आले. कम्प्युटर लॅब चे उद्घाटन गंभा इंदुबाई शिरुडे यांचे हस्ते तर सायकल वाटप संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण ,रविंद्र शिरुडे व मान्यवर संचालक व रोटरी पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुलींनी सुंदर स्वागत पद्य सादर केले. व्यासपीठावर रा स शि प्र मंडळाचे सचिव प्राचार्य बाळासाहेब चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्यासमवेत प्रमुख अतिथी म्हणून ग.भ. इंदुबाई शिरूडे, प्रोजेक्ट प्रमुख रविंद्र शिरुडे, स्वयंदीपच्या मीनाक्षीताई निकम, रोटरी मिल्कसिटी संगमचे अध्यक्ष शालिग्राम निकम, सचिव अविनाश करंकाळ, रा स शि प्र मंडळाचे संचालक भाऊसाहेब पाटील, प्रमोद पाटील, सुनील देशमुख, बी बी बोरसे, माजी संचालक सुधीर पाटील, मनिषा शिरुडे, शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब जगताप, पी. एस.
करंकाळ, पी.डी. पाटील, शिवराम गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.ए. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानान मोरे यांनी तर आभार बी.एस.वाडेकर यांनी मानले .













