प्रयत्नांना यश… शेवगाव येथील कुसुमताई घेणे यांना २ लाखांचे आर्थिक सहाय्य!

प्रयत्नांना यश… शेवगाव येथील कुसुमताई घेणे यांना २ लाखांचे आर्थिक सहाय्य!

प्रतिनिधी शरद दुधाळ

शेवगाव येथील श्रीमती.कुसुम उत्तम घेणे यांचे पती बांधकाम कामगार म्हणून कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.
कुसुमताईंची बांधकाम कामगार विभागाकडे नोंदणी झाली होती मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या.
यासंदर्भात पाठपुरावा करून आवश्यक प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत कुसुमताईंना रुपये २.०० लाखांचे आर्थिक सहाय्य मंजूर झाले आहे. आज बांधकाम कामगार आयुक्त अहिल्यानगर श्री.रेवन्नाथ डिसले, त्यांचे सहकारी श्री.ललित दाभाडे यांच्या उपस्थितीत मदतीचा धनादेश श्रीमती कुसुमताई यांना सुपूर्द केला.
कष्टकरी बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला संकटाच्या काळात आर्थिक आधार मिळावा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचावा, यासाठी सदैव प्रयत्नशील आहे.
BJP Maharashtra Devendra Fadnavis
बांधकामकामगार आर्थिकसहाय्य अहिल्यानगर

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें