त्र्यंबकेश्वरला जाण्यापूर्वी थांबा! सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे मंदिराच्या दर्शन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

त्र्यंबकेश्वरला जाण्यापूर्वी थांबा! सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे मंदिराच्या दर्शन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

नाशिक प्रतिनिधी सचिन देवरे.

त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी!

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शन व्यवस्थेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

१५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत मंदिर बंद ठेवण्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले असून, यामुळे भाविकांमध्ये संभ्रम आणि नाराजी व्यक्त होत आहे.

मात्र, मंदिर बंद ठेवण्याबाबत अंतिम अधिकृत निर्णय काय आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे.

त्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाण्यापूर्वी मंदिर प्रशासनाकडून दर्शनाची वेळ, प्रवेश व्यवस्था आणि सध्याची स्थिती तपासून घ्या.

सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी महत्त्वाची असली, तरी भाविकांना योग्य माहिती मिळणेही तितकेच गरजेचे आहे.

त्र्यंबकेश्वरच्या दर्शन व्यवस्थेतील पुढील घडामोडींवर आमचे लक्ष असेल.

AVB MAZA NEWS, नाशिक प्रतिनिधी सचिन देवरे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें