- सातारा जिल्हयातील भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरूर ता. वाई परिसरात अतिदुर्मीळ असलेल्या खवले मांजर या वन्यप्राण्याची तस्करी करणा-या इसमाच्या सातारा स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
सातारा प्रतिनिधी:
श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्हयात बेकायदेशीरपणे वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक, अरूण देवकर स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक, अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक, विश्वास शिंगाडे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते.
पोलीस निरीक्षक, श्री अरूण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे दिपक श्रीरंग मोहिते, रा. वहागांव ता. वाई जि. सातारा याने अतिदुर्मीळ वन्यप्राणी खवले मांजर हे तस्करी करण्याचे उद्देशाने स्वत:चे ताब्यात ठेवुन घेतले आहे अशी बातमी प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक, अरूण देवकर स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी पोलीस उप निरीक्षक, विश्वास शिंगाडे यांच्या पथकास त्या ठिकाणी जावुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
दिनांक २८/१२/२०२४ रोजी पोलीस उप निरीक्षक, विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखालील पथकाने मिळाले बातमीच्या ठिकाणी सुरूर ता. वाई येथे जावुन मिळाले बातमीतील इसमास राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक ४८ चे सव्र्हस रोडवर मिळाले बातमीतील इसमास ताब्यात घेतले असता त्याचेकडील गुलाबी रंगाचे पॉलीथीनचे पोत्यामध्ये दुर्मीळ प्राणी खवले मांजर मिळुन आले. त्याच्याकडे अधिक विचारपुस करता त्याने ते वहागांव ता. वाई गावचे हद्दीतील डोंगरामध्ये पकडुन त्याची विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार वनपाल भुईंज यांना बोलावुन घेवुन खवले मांजराबाबत समक्ष माहिती घेतली असता त्यांनी ते खवले मांजर हे वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ चे शेड्युल १ मधील असल्याचे सांगितले. त्यानुसार दिपक श्रीरंग मोहिते, वय ४४ वर्षे, रा. वहागांव ता. वाई जि. सातारा याचेविरुध्द भुईंज पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४०७/२०२४ वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८ (अ), ४९ (ब), ५०, ५१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उप-निरीक्षक, विश्वास शिंगाडे पोलीस अंमलदार अतिष घाडगे, अजित कर्णे, शिवाजी भिसे, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, सचिन ससाणे, प्रवीण पवार, दलजित जगदाळे तसेच वनविभागातील वनपाल दिलीप व्हनमाने, वर्षाराणी चौरे यांनी सदरची कारवाई केलेली आहे. कारवाईमधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.













