रेल्वे प्रवासी यांच्यासाठी अधिकृत पार्किंगची व्यवस्था उपलब्ध; पत्रकार कल्पेश महाले यांच्या मागणीला यश
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :- रेल्वे स्टेशन परिसरात धुळे रोड भाग कडून रेल्वेने अपडाउन करणाऱ्या प्रवाशांच्या पार्किंग केलेल्या अनेक बाईक चोरीला गेल्या होत्या. तसेच GRP पोलीस स्टेनच्या जवळील रेल्वे स्टेशन आवारातून पार्किंग केलेले वाहन वारंवार चोरीला जात असलेले पाहून GRP पोलीस स्टेशनच्या API मॅडम यांनी काही महिन्यांपूर्वी चाळीसगाव शहर वाहतूक शाखेला पत्र देऊन ट्राफिक पोलीस बोलवून आवारात पार्किंग केलेल्या अनेक वाहनांवर आर्थिक बेकायदेशीर पार्किंग म्हणून दंड केला होता. काही जळगाव अपडाउन करणाऱ्या करणारे प्रवाशांनी पत्रकार कल्पेश महाले यांना आपली समस्या सांगितली की, आम्ही या परिसरात बाईक आमच्या जबाबदारीवर दररोज पार्किंग करतो, पण GRP पोलिसांनी ट्राफिक पोलिसांना बोलवून आमच्या अनेक वाहनांवर दंड केला, त्यानंतर चाळीसगाव GRP पोलीस स्टेशनच्या API मॅडम यांना जाब विचारणा केली असता, तुम्ही उदरनिर्वासाठी दररोज अपडाऊन करणारे लोकांना त्यांच्या वाहनांना दंड ट्रॅफिक पोलिसांना सांगून टाकला आहे, हे मॅडम आपण कोणाच्या आदेशाने दररोज रेल्वेने अपडाउन करणारे चाळीसगाव येथील लोकांना त्रास देत आहात. तेव्हा त्यांनी सांगितले की स्टेशन मास्तर बडगुजर यांनी सांगितले होते, लगेच तात्काळ स्टेशन मास्टर बडगुजर यांना विचारले असता त्यांना सांगितले की GRP पोलिसांनी आपण रेल्वे प्रवासी करणाऱ्या लोकांच्या वाहनांना आर्थिक दंड द्यायला सांगितले आहे का.? स्टेशन मास्तर बडगुजर यांनी लगेच उत्तर दिले की मी नाही सागितले आहे. त्यानंतर लगेच भुसावळ रेल्वे विभागाचे DRM श्री पुनित अग्रवाल व त्यांचे P A (स्वीय सहाय्यक) जीवन चौधरी व खासदार स्मिताताई वाघ तसेच मध्य रेल्वेचे DRUCC (Divisional Railway Users’ Consultative Committee) विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती DRUCC मेंबर चाळीसगाव येथील के. बी. दादा साळुंखे यांना कॉल वर या समस्यांची तक्रार करत धुळे रोड व मालेगाव रोड या भागातील दररोज रेल्वे ने अपडाउन करणारे रेल्वे प्रवासी यांना आपण GRP पोलीस स्टेशनच्या बाजूला चाळीसगाव रेल्वे स्टेशनच्या परिसरात जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर अधिकृत पार्किंगची सुविधा सुरू करण्यात यावी जेणे करून दररोज अपडाउन करणारे रेल्वे प्रवासी यांना वाहन पार्किंग चा त्रास होणार नाही आणि बाईक चोरीला जाणार नाही अशी मागणी पत्रकार कल्पेश महाले यांनी केली होती. आज त्या ठिकाणी मागणी मंजूर करून धुळे रोड व मालेगाव रोड भागातून येणारे रेल्वे प्रवासी यांच्यासाठी काही दिवसांपूर्वी अधिकृत पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.













