राष्ट्रवादीचे नेते संजय कोचे अनंतात विलीन.
गडचिरोली – (प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काॅंग्रेस ( शरद पवार ) पक्षाचे नेते संजय कोचे वय ५२ वर्ष गोकुळनगर गडचिरोली यांचे दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने नागपूर येथे निधन झाले.
ते मनमिळाऊ स्वभावाचे होते . त्याच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्याने त्यांनी चांगली कामगिरी केली असल्याने लोकप्रियता मिळवली. संजयभाऊ कोचे यांना निमोनिया झाल्यामुळे सामान्य रुग्णालय गडचिरोली येथून खाजगी दवाखाना नागपूर येथे हलविण्यात आले होते. त्यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले
संजय कोचे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज दि. ४ वाजता कठाणी नदिवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Author: AVB Majha
Post Views: 281













