मातंग समाजाच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी आवाज उठविणार – आ.अमित गोरखे
चाळीसगाव प्रतिनिधी :-
मातंग समाजाच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि विविध सामाजिक संघटना कटिबद्ध आहेत. आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी प्रामुख्याने विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री साहेब जातीने लक्ष देणार असल्याचे सुतोवाच आमदार अमित गोरखे यांनी यावेळी केले. ते आज चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय सकल मातंग समाज प्रबोधन मेळाव्या प्रसंगी बोलत होते. आपल्या समाजाच्या प्रमुख मागण्या आणि समस्या यासोबत क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या सर्व शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी मी स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचा आत्मविश्वास यावेळी अमित गोरखे यांनी व्यक्त केला. मातंग समाज हा कष्टाळू आणि मेहनती असून आज मोठ्या संख्येने प्रबोधन मेळाव्यात एकत्र असल्याचा आनंद वाटतोय. क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सदस्यासोबत मी सदैव असून त्यांचा समस्याची सोडवणूक करण्यासाठी तत्पर असल्याचे आश्वस्त आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी केले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे, आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेश घोडे, अनुसूचित जाती महामंत्री सर्जेराव जाधव, अहिल्यानगर भाजप अध्यक्ष नितीन दिनकर, शिर्डीचे उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, वैजनाथ वाघमारे, सूर्यकांत भालेराव, नाना खंडागळे, सौ.आशाताई अंबोरे, लताताई बाविस्कर, गुरूदास भालेराव, योगेश नवगिरे, सुभाष पगारे, राम काळुंखे, अर्जुन मरसाळे, प्रकाश कोतकर, रविंद्र थोरात संजय कापसे, मनोज नवगिरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होतेत तर कार्यक्रमाचे आयोजक भूषण नवगिरे यांनी आभार मानले.













