गणेश विसर्जनासाठी फलटण नगरपरिषदेची जय्यत तयारी; कृत्रिम तलावांसह विविध सुविधा उपलब्ध

गणेश विसर्जनासाठी फलटण नगरपरिषदेची जय्यत तयारी; कृत्रिम तलावांसह विविध सुविधा उपलब्ध

फलटण : प्रतिनिधी

फलटण शहरातील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी फलटण नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, शहरातील प्रमुख चौकांमध्ये गणेशमूर्ती संकलन वाहने, विसर्जन मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता आणि आपत्कालीन सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.

घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सांस्कृतिक भवन आणि यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. तसेच पिरॅमिड चौक, डी.एड. कॉलेज चौक, गजानन चौक आणि उदेश्वर चौक या ठिकाणी गणेशमूर्ती संकलन वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

विसर्जन सोहळ्यादरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच विसर्जन मार्गांवर आवश्यक विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी पंढरपूर पूल, बारामती पूल आणि रोती शाळा परिसरात आवश्यक क्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे. विसर्जनस्थळी लाइफगार्ड, स्वच्छता व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, यासाठी अग्निशमन वाहन आणि रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

गणेश विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावा, यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व लहान-मोठ्या गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा आणि विसर्जनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निर्मल जाधव यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें