महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी घोषित. ⭕ जिल्हाध्यक्ष पदी मंगला चंदनखेडे तर सचिव पदी शर्मिला जनबंधु यांची निवड.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी घोषित.
⭕ जिल्हाध्यक्ष पदी मंगला चंदनखेडे तर सचिव पदी शर्मिला जनबंधु यांची निवड.
गडचिरोली / प्रतिनिधी दि. २४/९/२०२६:- महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना गडचिरोली यांची जिल्हास्तरीय आमसभा गडचिरोली पंचायत समिती सभागृहात पार पडली. या आमसभेत जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी रंजना ताई कोहपरे.. महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना राज्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत पारदर्शक रित्या, सुरळीत पार पडली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कविताताई बोंद्रे महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना कार्याध्यक्ष, माजी जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष माया ताई सिरसाट,अमिता ताई नागदेवते जिल्हा परिषद नर्सेस संघटना सहसचिव चंद्रपूर, सुलोचना ताई शिरभाते , मुनीश्वर बोरकर साहेब संपादक वैनगंगा पुकार , चक्रधर मेश्राम राष्ट्रीय अनुसूचीत जाती जनजाती विकास परिषद जिल्हा महासचिव उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकारी व सदस्यांच्या मते जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठित करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद नर्सेस संघटनाच्या सल्लागार म्हणून श्रीमती मायाताई सिरसाट , सुलोचना सिरभाते, संघटक पदावर प्रतिभा गोडबोले, हिना कावळे , सहसचिव पदासाठी गंगा तांदळे, दर्शना दडमल , सहकोषाध्यक्ष म्हणून निवृत्ती पेंदाम, प्रसिद्धी प्रमुख भारती शिडाम यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदावर मंगलाताई चंदनखेडे, सचिव पदावर शर्मिला जनबंधू, मानद अध्यक्ष नीलूताई वानखेडे, कार्याध्यक्ष छायाताई मानकर , कोषाध्यक्ष कमलताई नगराळे , उपाध्यक्ष पदासाठी संगीता सरोदे, वंदना भारती, चंपा उईके, यांना नियुक्त करण्यात आले. या कार्यक्रमात सेवानिवृत सत्कारमूर्ती आरोग्य सेविका भगिनींचे साडी, शाल देऊन सत्कार करून पुढील आरोग्यमयी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनियुक्त सचिव शर्मिला जनबंधू यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमल नगराळे, आभार प्रदर्शन मंगला चंदनखेडे यांनी केले .या आमसभेला जिल्ह्यातील नर्सेस बहुसंख्येने उपस्थित होत्या. संघटनेशी एकनिष्ठ असणाऱ्या आरोग्य सेविका भगिनींचे मनपूर्वक स्वागत,अभिनंदन करण्यात आले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें