सेवा संकल्प अभियानांतर्गत हातले शाळेत विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती

सेवा संकल्प अभियानांतर्गत हातले शाळेत विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-

 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत हातले, ता. चाळीसगाव येथील माध्यमिक विद्यालयात दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी विविध जनजागृतीपर व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, शैक्षणिक सुविधा तसेच करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे अनिल पगारे यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी स्वाधार व शिष्यवृत्ती अर्ज निर्मिती याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेचा लाभ घेताना आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासकीय वसतिगृह व निवासी शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांची १०० टक्के आरोग्य तपासणी करून त्यांचा डिजिटल हेल्थ रेकॉर्ड तयार करण्याच्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे आणि आरोग्यविषयक नोंदी डिजिटल पद्धतीने उपलब्ध ठेवण्याचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीच्या दृष्टीने कौशल्य आधारित करिअर कौन्सलिंग या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धा परीक्षांची तयारी, व्यक्तिमत्त्व विकास, विविध कौशल्यांचा विकास आणि भविष्यातील करिअरच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय ‘स्वच्छ व सुंदर संस्था परिसर’ या संकल्पनेअंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान आणि भव्य वृक्षारोपण मोहीम यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. ‘विद्यार्थी गृहपाल भेट संवाद मंच’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी आणि शैक्षणिक गरजा जाणून घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन व उपाययोजना करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. समाजकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासकीय योजना, आरोग्य, करिअर, स्वच्छता, पर्यावरण आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत उपयुक्त माहिती मिळाली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें