महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची आमसभा २० सप्टेंबर रोजी गडचिरोलीत .
⭕ सत्कार समारंभ आणि नवीन कार्यकारिणी गठित होणार.
⭕ संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षा श्रीमती माया सिरसाठ यांचे आवाहन.
गडचिरोली / प्रतिनिधी दि. १७/९/२०२६:-
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना महाराष्ट्रातील जिल्हा परिषद परिचारिकांच्या (नर्सेस) हक्कांसोबतच त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करणारी अधिकृत संघटना आहे. गडचिरोली जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची आमसभा दि. २० सप्तेंबर रोजी पंचायत समिती सभागृह धानोरा रोड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या आमसभेत नवीन कार्यकारणीची निवड आणि परिचारिकांच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेने विविध प्रलंबित मागण्या साठी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे व शासनाकडे निवेदने देऊन आंदोलने केली आहेत. त्यात नर्सेस भगिनींच्या समस्या शासन दरबारी मांडण्यात आल्या. आरोग्य सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या सेवाविषयक सुरक्षिततेसाठी आणि हक्कांसाठी आवाज उठवणे, संघटनेच्या सध्याच्या मागण्या, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे . तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या प्रलंबित मागण्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेसोबत एकनिष्ठ असलेल्या पदाधिकारी , सदस्यांची आमसभा आणि निवडणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे . तरी सर्व भगिनींनी तसेच सत्कारमूर्ती म्हणून निवड करण्यात आलेल्या नर्सेस मंडळींनी व पदाधिकाऱ्यांनी या आमसभेला न चुकता
उपस्थित रहावे असे आवाहन माजी जिल्हाध्यक्ष श्रीमती माया सिरसाठ यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्हा अति दुर्गम डोंगराळ व नक्षलग्रस्त भागामध्ये नर्सेस भगिनींनी आरोग्य सेवेचे अहोरात्र प्रामाणिकपणे कार्य केले आहे. त्या अनुषंगाने नर्सेस भगिनींच्या सेवाविषयक तसेच विविध समस्यांवर प्रश्नावर विचार मंथन करून राज्यस्तरावर सेवा विषयक प्रश्न मार्गी लावण्याकरता मार्गदर्शन करणार आहे. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता या आमसभेला हजर राहावे. भारतामध्ये लोकशाही आहे हुकूमशाही नाही . निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे कारण शासनाने नेमून दिलेले कार्य आणि कामाचा व्याप लक्षात घेता उपाययोजना करावी लागेल . त्यामुळे सर्व नर्स भगिनींनी एकत्र येणे फार गरजेचे आहे. पंचायत समिती सभागृह गडचिरोली येथे दिनांक 20/9/26 ला रविवारला बारा वाजता. आयोजित करण्यात आलेल्या आससभेला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी जिल्हाध्यक्ष श्रीमती माया सिरसाठ यांनी केले आहे.












