रोटरी तर्फे तांडे वस्तीतील विद्यार्थिनींना सायकल वाटप
चाळीसगाव प्रतिनिधी :- रणधीर जाधव
तालुक्यातील सांगवी येथील केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेत २४ रोजी रोटरी क्लब ऑफ मिल्कसीटी तर्फे गरजू व वंचीत मुलींना ३० सायकलींचे वाटप करण्यात आले .यावेळी व्यासपीठावर रोटरी मिल्कसिटी संगमचे अध्यक्ष शालिग्राम निकम, सचिव अविनाश करंकाळ, रोटरी डिस्ट्रिक्ट चेअर सर्जिकल बँक रविंद्र शिरूडे, डिस्टिक को चेअर अल्युम्नी प्रकाश कुलकर्णी, बालाप्रसाद राणा, रमेश पोतदार, राजेंद्र मुंदडा, विजय चौधरी, निगार चव्हाण, वैशाली वाघ, विजय चौधरी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जालिंदर चव्हाण, सदस्य संभाजी जाधव, सरपंच संतोष राठोड, उपसरपंच रोहिदास भाऊ, मुख्याध्यापक बालू वाणी यांचे उपस्थित सायकल वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रवींद्र शिरोडे यांनी सांगितले की आपण मुलींनाच का सायकल देतो कारण त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते, त्यांनी सायकल चालवल्यानंतर त्यात थकणार त्यामुळे ते चांगले जेवण करणार त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढेल त्यांची उंची वाढेल त्यांच्या शालेय जीवनाचा मार्ग सुकर होईल त्याचसोबत सक्षम महिला म्हणून त्यांनी जगापुढे यावे यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष शालिग्राम निकम यांनी सांगितले की आम्हाला आजची कन्या ही भविष्यातील सक्षम स्त्री घडवायची आहे. सायकलचा वापर फक्त घर व शाळा यातील अंतर कमी करण्यासाठी करा. मोबाईलचा अपव्यय टाळा. चांगला अभ्यास करा. सायकलची गती साधेल शिक्षणाची प्रगती वाढेल. सायकल वाटल्या केल्याबद्दल गावकरिंनी रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगमचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक भारत पाटे, मधुकर जाधव, विकास पाटील, मनीषा भामरे, गीता राठोड, योगेश जाधव, सचिन पाटील यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशिल शिक्षक दीपक पाटील यांनी केले तर आभार अनिल चांदणे यांनी मानले.












