🎙️ खान्देशच्या लोकपरंपरेचा भव्य जागर!
धुळे जिल्ह्यातील म्हसदी गावातील लोकदैवत कानबाई मातेचा भव्य दिव्य उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला.
खान्देशातील अनेक कुटुंबांचे श्रद्धास्थान असलेल्या कानबाई मातेला सुख-समृद्धी, कुटुंबाचे रक्षण आणि संकटांपासून संरक्षण करणारी लोकदैवत म्हणून श्रद्धेने पूजले जाते.
कानबाई उत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर खान्देशची परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे.
या उत्सवानिमित्त देवीची पूजा-अर्चा, आरती, नैवेद्य, पारंपरिक गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग व महिला बाल गोपालांसह माहेरवाशिणी, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येतात.
म्हसदी गावात होणाऱ्या या उत्सवातून जुनी लोकपरंपरा आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर महोत्सव साला माझा प्रमाणे पाहायला मिळाला.
खान्देशच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा हा अनोखा उत्सव… म्हसदीत कानबाई मातेच्या जयघोषात विविध रंगी गुलाल वाद्य व पारंपारिक नृत्य एकत्रित सादर करीत कार्यक्रमाची सांगता झाली. नाशिक प्रतिनिधी सचिन देवरे AVB माझा
🚩 जय कानबाई माता!












