कार्यालयात बसून आदेश नाही… तर ऑन ग्राउंड गावात जाऊन प्रश्नांचा थेट निपटारा करणारी सभापती

कार्यालयात बसून आदेश नाही… तर ऑन ग्राउंड गावात जाऊन प्रश्नांचा थेट निपटारा करणारी सभापती!

फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची ‘प्रत्यक्ष पाहणी, तात्काळ कार्यवाही’ची कार्यपद्धती चर्चेत

प्रतिनिधी : शिवाजी भोसले

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांच्या कन्या कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले या साखरवाडी–पिंपळवाडी गणातून विजयी झाल्या आणि फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाल्या.

पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर “कार्यालयात बसून आदेश देण्यापेक्षा गावात जाऊन समस्या समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही करणे” या भूमिकेतून सभापती कु. शिवांजली भोसले यांचा गावभेटींचा धडाका सुरू आहे.

‘पंचायत आपल्या दारी’ या भूमिकेतून त्या थेट गावागावात पोहोचत असून, नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.

याचाच प्रत्यय नुकताच ग्रामपंचायत होळ येथे आला. सभापतींनी स्वतः अंगणवाडीला भेट देऊन लहान मुलांना मिळणारे स्वच्छ पाणी, शालेय पोषण आहार तसेच अंगणवाडीतील मूलभूत सुविधांची पाहणी केली. संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या दुरुस्त्या व सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

तसेच होळ येथील प्रसिद्ध ढगाई मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि गावातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लवकरच पंचायत समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी सांगितले.

“फाईलवर सही करण्यापुरते पद नाही; जनतेच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्यासाठी पद आहे!”

गावातील समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणे, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न करणे, या कार्यपद्धतीमुळे सभापती कु. शिवांजली भोसले यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें