फलटणातील नामांकित दूध डेरीत खळबळ; भेसळयुक्त दूध निर्मिती घटल्याने चर्चा सत्रांना सुरुवात?
फलटण | प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कठोर कारवाईमुळे राज्यभरात दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्ता तपासण्या वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फलटणातील एका नामांकित दूध डेरीचे दूध संकलन व उत्पादन घटल्याची चर्चा सुरू असून, डेरी व्यवस्थापनाने विविध चर्चा सत्रे व बैठका घेण्यास सुरुवात केल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, या घडामोडींवरून नागरिकांमध्ये विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “आतापर्यंत स्वच्छता व गुणवत्तेबाबत पुरेशी काळजी घेतली जात होती का? आणि आता अचानक स्वच्छता, गुणवत्ता नियंत्रण व उत्पादकांशी संवाद यांची गरज का भासू लागली?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
काही नागरिकांचे म्हणणे आहे की, अन्न व औषध प्रशासनाच्या वाढत्या तपासण्या आणि गुणवत्तेबाबतच्या कठोर निकषांमुळे अनेक डेऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच संबंधित डेरीकडूनही गुणवत्ता सुधारणा, स्वच्छता आणि दूध उत्पादकांशी संवाद वाढविण्यासाठी बैठका आयोजित केल्या जात असल्याची चर्चा आहे.
मात्र, भेसळयुक्त दूध निर्मिती किंवा गुणवत्ता संदर्भातील कोणतेही आरोप संबंधित अधिकाऱ्यांच्या अधिकृत तपासणीतून सिद्ध होणे आवश्यक असून, याबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत.
एव्हीबी माझा












