विजय पाटील राज्यस्तरीय “शिवछत्रपती ” पुरस्काराने सन्मानीत
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):-
दरवर्षी नाशिक येथील आशा फाउंडेशन या संस्थेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार या वर्षी चाळीसगाव येथील पत्रकार तथा जगदंबा ऑटोपार्टचे संचालक विजय पाटील यांना, त्यांच्या राजकीय, सामाजिक व पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरीच्या आधारावर त्यांच्या कार्याची आवड पहाता त्यांना ‘आदर्श समाजकार्य पत्रकारिता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकताच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून मा .प्रतापराव दिघावकर (माजी विशेष पोलीस महानिरीक्षक तथा लोकसेवा आयोग सदस्य ), अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपमुख्य कार्य अधिकारी वर्षा फडोळ बेडसे , डॉ .अमोल शेजवळ (लासलगाव ) प्रा . सी .डी रोटे सर (निफाड ) , मा . संजय देशमुख (नाशिक), मा .जगन्नाथ बच्छाव गुरुजी कौळाणे व संस्थेचे मुख्य आयोजक राजेंद्र राऊत पाटील व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे विजय पाटील यांचे चाळीसगाव व परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे .












