ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्या होम पिचवरून तुफान फलटणच्या दिशेने टोलेबाजी…
वाई मधील नागरी सत्कार सोहळ्यात मंत्री जयाभाऊ काय बोलणार याकडे लक्ष लागून होते त्यांनी चक्क मंत्री मकरंद आबांच्या होम पिचवरून तुफान बॅटिंग करत फलटणच्या दिशेने आलेले सर्व यारकर बॉल बॉण्डरीच्या बाहेर टोलवले. जयाभाऊंच्या तुफान बॅटिंगमूळे विरोधकांचे बॉलर सुद्धा घायाळ झाले. आता या सभेमुळे नव्याने राजकिय समिकरण पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. ते नेमके भाषणात काय म्हणाले, मी इथे कोणाची जिरवायला येत नाही तर आमच्या कार्यकर्त्यांला बळ द्यायला येतो, ताकद द्यायला येतो, अनिल सावंत तुमची तब्येत कसली जरी असली तरी…. विराजला, तो कोण तरी मार्केट कमिटीतला एक आहे, विराजला असा करतो, तसा करतो, बोलत होता, विराजच्या केसाला धक्का लावून दाखव. वाई सारख्या सुसंकृत शहरात अस बोलू नये पण जर कोणी तशा भाषेत बोलला तर उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत, कोणाच्या पण नादाला लागा, पण आपल्या नादाला लागू नका, आपण कोणाच्या नादाला लागत नाही आणि आपल्या नादी लागला तर आम्ही सोडत नाही, सावज टप्यात आलं की कार्यक्रम करतोच, मग वर्षे लागर्ल दोन वर्षे लागलं, सावज टप्यात यायची वाट बघायची पण क्षमता पण आपली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूकीत म्हणे, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला धक्का लागला, यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण झाली हे तरी थोडक आहे का?, हा समोर उभा राहिलेला जयकुमार गोरे 22 केसेस अंगावर, एक अर्धी नाही. जिल्हा परिषद निवडणूकीचा अर्ज भरत होतो त्यावेळी मला गुन्हा दाखल केला अन अटक केली, तेव्हा कुठं गेली होती यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा, तेव्हा कुठं गेली होती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यातील संस्कृती, पाठीमागे विधान परिषद निवडणूक झाली तेव्हा पराभव झाला, त्या पराभवाला एवढे उद्विघन झाले गडी, माझ्या म्हसवड शहराच्या नगरपालिका निवडणूक अगोदर माझ्यावर गुन्हा दाखल केला अख्खी निवडणूक होई पर्यत मला तालुक्यात जिल्ह्यात येऊ दिल नाही, तेव्हा कुठं गेली होती यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्कृती, तेव्हा कुठं गेले होते यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार, जेव्हा आपल्यावर येत तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब आठवतात आणि समोरच्याला ठोकतात तेव्हा कुठे जातात हे विचार. हे एकदा झालं नाही, मी मंत्री झालो ज्या पद्धतीने जयकुमार गोरेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, हा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे, सामान्य कुटुंबातल पोरग चार वेळा संघर्ष करून आमदार झालं, या जिल्ह्याचा सुपुत्र राज्याचा ग्राम विकासमंत्री झाला, तेव्हा त्याच मंत्री पद घालवायला आपण काय काय उधोग केले, कोणाकोणाला प्रेस घ्यायला लावल्या अन काय काय भानगडी करायला लावल्या, तेव्हा कुठं गेली होती नीतीमता, ज्यांनी हे केलं ज्यांनी हे करायला भाग पाडले, प्रेस झाली, ट्रॅप झाला, पैसे घेतले सगळं केलं, त्यांनी कबूल केलं की हे कोणी करायला लावलं, ज्यांनी केलं त्याला वाचवायला याच तालुक्याचे आमदार, याच तालुक्याचे मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे गेले तेव्हा कुठं गेली होती संस्कृती?, तेव्हा कुठं गेली होती नितीमता, हे नितीमतेच्या गप्पा मारतात का?, तुम्हाला मान आहे, तुम्हाला सन्मान आहे, तुम्ही संस्थानिक आहे म्हणून. सामान्य कुटुंबातील माणसाला मान सन्मान नाही का?, गोरगरीबाच्या शेतकऱ्यांच्या पोरांना मान सन्मान नाही का?, मान सन्मानच्या गोष्टी शिकवता कोणाला?, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी?, जे पेरलं ते कधी तरी उगवणार आहे?, आता जीआर काढलाय, पूर्वी काय व्हायच पोटाला आलाय, आजा, खापर पंजा, मग आपण काय करायचो, नाव ठेवायचो त्याच, पोटाला आलाय म्हणून आज्यान केलेलं असेल ते नातवान पोटाला येऊन फेडायचे, आता तसल काय चालणार नाही, स्मशानभूमीत जाईपर्यत तुझं तिकीट, त्यामुळे इथंच केलं इथंच फेडायचे, आपण दुसऱ्याला नितीमता सांगता आता कशाला रडता, अशा शब्दात फलटणच्या राजेंच्यावर निशाणा मंत्री जयकुमार गोरे यांनी साधला.












