नंबर प्लेट नसलेले डंपर आणि ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करावी अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी :-
नंबर प्लेट नसलेले गौण खनिज वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने आर टी ओ चाळीसगाव यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे, दिनांक 7 रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आरटीओ यांच्याकडील निवेदनात म्हटले आहे की दसेगाव फाट्याजवळ 2 एप्रिल रोजी वाळूच्या डंपरने स्कुटीला जोराने धडक दिल्याने चंचल नामदेव लांडगे ही मुलगी जागेच मृत्यू झाली होती, तसेच वैष्णवी चौधरी हिची प्रकृती चिंताजनक आहे. या गंभीर प्रकरणाच्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यात व शहरात संताप व्यक्त आहे. व प्रशासनाचे बाबत नाराजीजा सूर उमटत आहे. चाळीसगाव तालुक्यात व शहरात अवैध वाळू व मुरुम वाहतूक करणारे अनेक डंपर व ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात चालू आहे ट्रॅक्टर व डंपर वरील ड्रायव्हर हलगर्जी पणाने व जोरात वाहन चालवतात त्यामुळे अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. रात्री बेरात्री वाळू मुरूम खाली करतात त्यामुळे नागरिकांची झोप मोड होऊन त्यांना त्रास सहन करावा लागत आहे या गौण खनिज वाहतूक करणारे वाहनांना कोणत्याही नंबर प्लेट दिसून येत नाही गौण खनिज वाहतूक करणारे डंपर ट्रॅक्टर छोटे मोठे वाहन नंबर प्लेट नसलेले अशा सर्व वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले शहराध्यक्ष कैलास पाटील तालुका उपाध्यक्ष प्रशांत पाटील युवक तालुका उपाध्यक्ष रोहित बोरसे सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान मधुकर पाटील आदींच्या सह्या आहेत











