तो पुन्हा आला!सोनगाव बंगला येथे बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा! वनविभाग घटनास्थळी! ग्रामस्थांनी घाबरून न जाण्याचे वन विभागाचे आवाहन!

तो पुन्हा आला!सोनगाव बंगला येथे बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा!

वनविभाग घटनास्थळी! ग्रामस्थांनी घाबरून न जाण्याचे वन विभागाचे आवाहन!

फलटण: फलटण वन विभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीवरून काल रात्री सोनगाव सरडे गावच्या हद्दीतील सोनगाव बंगला येथील श्री. शहा यांच्या बाहुबली फॉर्म हाऊस मधील पाळीव कुत्रा संशयित मृत अवस्थेत आढळून आला असता वनविभागातील कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणी केली असता त्यांनी असे अनुमान लावले की सदरचा हल्ला हा बिबट्याकडून झालेला दिसून येत आहे. तरी गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सतर्क रहावे.घाबरून जाऊ नये असे आवाहन फलटण वन विभागाचे वनपाल नितीन जगदाळे यांनी केले आहे.तसेच संशयित काही आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधावा. जगदाळे- 9665503999.

यावेळी त्यांच्या समवेत विशाल शिंदे वनरक्षक फलटण,ग्लोबल अर्थ फाउंडेशनचे सचिन जाधव व टीम उपस्थित होती.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर