बारामतीच्या शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का, बोगस सर्टिफिकेट..गैरवापर झाल्याने डॉक्टरवर गुन्हा दाखल..

बारामतीच्या शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का, बोगस सर्टिफिकेट..गैरवापर झाल्याने डॉक्टरवर गुन्हा दाखल..

बारामती:-बारामतीत नक्की चाललंय काय? बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचा मुदत संपली असताना शिक्का वापरून स्वत:च्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या जखमी व्यक्तीला बोगस शासकीय प्रमाणपत्र

दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. पांडुरंग संभाजी गावडे (वय ४७, गावडे हॉस्पिटल,गुणवडी रोड, बारामती) असं गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. याबाबत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश जगताप यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीआहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश गावडे यांनी याबाबत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. त्यानुसार रुग्णालयाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.याबाबत माहिती अशी की, १ एप्रिल २०१९ रोजी गुणवडी रस्त्यावरील गावडे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमीला डॉ. पांडुरंग गावडे यांनी सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयाच्या शिक्क्याचा वापर करून बनावट प्रमाणपत्र दिले. या प्रमाणपत्रावर ‘Dr.Pandurang Gawade, Medical Officer, SJ Hospital Baramati ‘ असा शासकीय पदाचा शिक्का वापरण्यात आला होता. याबाबत सतीश गावडे यांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत डॉ.गावडे हे शासकीय सेवेत नसल्याचे स्पष्ट झाले.याबाबत न्यायालयातही खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात साक्ष देताना संबंधितांवर सही व शिक्का स्वतःचाच असल्याचेही कबूल केल्याचे डॉ.गावडे यांनी कबूल केले होते. त्यामुळे शासनाच्या शिक्क्याचा वापर करून संबंधित प्रमाणपत्रालाअधिकृतता प्राप्त झाल्याचा आभास निर्माणदिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. . 

बारामती शहर पोलिसांनी Bombay Nursing Homes Registration Act, 1949 मधील कलम१३, भारतीय दंड संहिता कलम ४१९ व ४२० नुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासपोलिस निरीक्षक श्रीशैल चिवड शेट्टी करत आहेत.याबाबत सतीश गावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर